कुपर रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्दयानंतर महापालिका आरोग्य विभागाला जाग, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वच्छता पंधरवडा

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता ही आता चिंतेचा विषय ठरला आहे. कुपर रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे महापालिका प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. त्यामुळे अखेर या रुग्णालयातील स्वच्छतेसाठी समिती गठीत करण्याची वेळ आली होती. याच रुग्णाच्या धर्तीवर मुंबईतील सर्व महापालिका रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ याकालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. संपूर्ण मोहिमेनंतर सर्व संस्थांचे मूल्यांकन व श्रेणीकरण करण्यात येणार असून सर्व आधारित मूल्यांकनानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना गौरवपत्र तथा प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.



महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांशी संबंधित विश्वासाला बळकटीकरण मिळावे यादृष्टीने रुग्णालयातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सुंदर वातावरण राखण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्या दृष्टीने आयोजित या स्वच्छता पंधरवड्याचा उद्देश हा आरोग्य संस्थांमधील स्वच्छता पातळी उंचावणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे, संक्रमण नियंत्रणावर भर देणे तसेच कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, हा आहे.



महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ याकालावधीत रुग्णालय कार्यालय, वसतिगृहे, चौक्या, उपहारगृहे, भांडारकक्ष (स्टोअर), रुग्णालय अंतर्गत पदपथ इत्यादी याठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यासोबतच निर्जंतुकीकरण, कचरा वर्गीकरण, कचऱयाची विल्हेवाट व्यवस्था, शून्य राडारोडा, भंगार यावर लक्ष केंद्रीत करुन कार्यवाही केली जाईल. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, कर्मचारी यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित सहायक आयुक्त, विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभाग, परिरक्षण विभाग, कीटकनियंत्रण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, उद्यान विभाग इत्यादींची मदत घेण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांचे अधीक्षक, वैद्यकीय अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात येणार आहे.





मोहिमेच्या कालावधीत रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छता जनजागृती उपक्रम, स्वच्छता शपथविधी, कर्मचारी सहभाग कार्यक्रम आणि रुग्ण जागरूकता मोहीम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमात स्थानिक सेवाभावी संस्था यांचीही मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने रुग्णालय आणि दवाखाने प्रत्येक आठवड्याचा प्रगती अहवाल आणि उपक्रमातील कृतींचे दस्तावेजीकरण करण्यात येईल.



आरोग्य सेवेतील सुधारणा, कर्मचारी सहभाग आणि रुग्ण संतोष वाढविण्यासाठी ही स्वच्छता मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचवण्याच्या अनुषंगाने एकत्रितपणे ही मोहीम राबवण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. स्वच्छता मोहिमेच्या यशासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य क्षेत्रातील सर्व रुग्णालये तथा संस्था, विभागातील विद्यमान मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)