श्रद्धा कपूर साकारणार " लावणी सम्राज्ञी विठाबाई " यांची भूमिका !

मुंबई : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. आता ‘छावा’ सिनेमाच्या यशानंतर लक्ष्मण उतेकर प्रसिद्ध लावणी नृत्यांगनेचं खडतर आयुष्य पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून एका मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे. सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर सिनेमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यांगना आणि ‘लावणी सम्राज्ञी’ म्हणून प्रसिद्ध, लोकप्रिय असलेल्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. पण जर हे खरं ठरलं तर श्रद्धाच्या कारकिर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका ठरू शकते. ‘तमाशा: विठाबाईचा आयुष्याचा’ ही प्रसिद्ध मराठी कादंबरी विठाबाईंच्या जीवनाची कहाणी सांगते.


विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या फक्त एक लावणी नृत्यांगना नव्हत्या तर, त्यांनी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. विठाबाई यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. गरिबी, समाजाच्या रूढीवादी विचारसरणीला आणि लावणी कलाकारांवरील लोकांच्या रागाला तोंड देत, विठाबाईंनी त्यांची कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.


विठाबाई यांच्याबद्दल एक किस्सा प्रचंड प्रसिद्ध आहे. ९ महिन्यांच्या गरोदर असताना विठाबाई यांना लावणी करताना प्रसुती वेदना सुरु झाल्या. पण त्यांनी लावणी थांबवली नाही. एवढंच नाही तर, त्यांना कळलं होतं की, त्या कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकतात.


अशात तीव्र प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर विठाबाई मंचामागे गेल्या आणि बाळाला जन्म दिला. एवढंच नाही तर, गर्भ नाळ देखील विठाबाई यांनी दगडाने ठेचून काढली. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रेक्षकांसमोर लावणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सादरीकरण थांबवलं नाही .



श्रद्धा कपूरचं मराठी कनेक्शन


श्रद्धा कपूरचं मराठी कनेक्शन जगजाहीर आहे. अभिनेत्रीचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे एक प्रसिद्ध गायक आणि कलाकार होते. श्रद्धा फार चांगलं मराठी बोलते. बायोपिकबद्दल सांगायचं झालं तर, याआधी देखील श्रद्धाने ‘हसीना पारकर’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात श्रद्धाने दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेला न्याय दिला होता. पण हा सिनेमा मोठ्या पडद्यावर अयशश्वी ठरला.

Comments
Add Comment

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित