Monorail Accident : 'ट्रॅक सोडून बाहेर'! वडाळा स्थानकाजवळ मोनोरेलचा भीषण अपघात; पहिला डबा खांबांवरच अडकला, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईच्या मोनोरेल सेवेला (Mumbai Monorail Service) लागलेले अपघातांचे ग्रहण काही सुटताना दिसत नाहीये. आज बुधवारी सकाळी चेंबूर ते वडाळा (Chembur to Wadala) मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी (Trial) सुरू असताना, वडाळा स्थानकाजवळ भीषण अपघात घडला आहे. मोनोरेलचा पहिला डबा (First Coach) थेट ट्रॅक सोडून बाहेर आला. सुदैवाने, हा डबा खाली न पडता मोनोरेलच्या खांबांवरच अडकून राहिला. यामुळे चालकाचा मोठा अपघात टळला आणि त्याचा जीव वाचला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने बचावकार्य (Rescue Operation) करत अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका केली आहे. अपघात घडला त्यावेळी मोनोरेलमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. सध्या या अपघातामुळे मोनोरेल सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. तांत्रिक त्रुटी की मानवी चूक याचा तपास केला जात आहे.


वडाळा अपघात: सिग्नल प्रणालीतील तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज





प्राथमिक माहितीनुसार, मोनोरेलच्या सिग्नल प्रणालीत (Signal System) तांत्रिक बिघाड (Technical Snag) झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या गंभीर घटनेबाबत मोनोरेल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघात सत्र सुरू असल्याने मोनोरेल सेवा यापूर्वीच प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. नव्या कोचेससह सध्या या मार्गावर चाचण्या सुरू होत्या. नव्या वर्षात मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र, आजच्या अपघातामुळे सेवेच्या विश्वासार्हतेबद्द पुन्हा एकदा संशयाचे वातावरण (Atmosphere of Doubt) निर्माण झाले आहे. सध्या घटनास्थळावर अपघातग्रस्त मोनोरेल मुख्य मार्गावरून बाजूला करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे तांत्रिक तपासणीचा मार्ग मोकळा होईल.
Comments
Add Comment

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

दुबार नावाच्या मतदारांकडून निवडणूक कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या कामांत अडथळा

नागरिकांना सहकार्य करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या

कांदिवलीत गुरुवारी पाणीबाणी

येत्या गुरुवारी ४ डिसेंबरला पाण्याचा वापर करा जरा जपून मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जलवितरण सुधारणा कामांतर्गत आर