प्रेमभंग आणि ब्लॅकमेलिंग; विरारच्या तरुणीची भयानक कहाणी!

कॉलेजबाहेर गोंधळ, वडिलांना मारहाण; अपमान असह्य झाल्याने २० वर्षीय ऋचा पाटीलची टोकाची भूमिका!


मनवेलपाड्यात थरार, ५ आरोपी गजाआड


विरार : विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील शिव शंभो अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. ऋचा पाटील नावाच्या या बी.कॉम.च्या विद्यार्थिनीला प्रेमसंबंधातून झालेल्या ब्लॅकमेलिंग आणि कॉलेजबाहेरील अपमानामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे उघड झाले आहे. या प्रकरणात विरार पोलिसांनी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.


ऋचाचे विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अमित दिनेश प्रजापती नावाच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होते, पण ते तुटले होते. मात्र ब्रेकअपनंतरही अमित ऋचाला सतत ब्लॅकमेल करत होता. या त्रासातून तिची सुटका होत नव्हती. घटनेच्या दोन दिवस आधी कॉलेजमध्ये दोघांमध्ये वाद झाला. ऋचा कॉलेजमधून बाहेर पडत असताना, अमितचा मित्र शिवा प्रल्हाद मदेसिया याने तिला अडवले आणि अमितचे म्हणणे मान्य करण्यासाठी दबाव टाकला. यामुळे त्यांच्यातही जोरदार वाद झाला.


या सर्व त्रासाची माहिती ऋचाने आपल्या वडिलांना दिली. १३ ऑक्टोबर रोजी ऋचा आणि तिचे वडील प्राचार्यांकडे तक्रार करण्यासाठी गेले, पण प्राचार्य उपस्थित नव्हते. याचवेळी अमित प्रजापती, शिवा, राकेश पाल, कृष्णा गुप्ता, एक अल्पवयीन मुलगी आणि अन्य दोन तरुण कॉलेजच्या आवारात पोहोचले. ऋचाच्या वडिलांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, या टोळक्याने ऋचाबद्दल उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या वडिलांनी अमितला कानाखाली मारली. यानंतर तिथे मोठा गोंधळ झाला आणि आरोपींनी ऋचा आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ करत, थेट वडिलांना मारहाण केली.


कॉलेजबाहेर झालेल्या या अपमानास्पद आणि मारहाणीच्या घटनेमुळे ऋचा पूर्णपणे खचून गेली. ती वडिलांना घेऊन घरी आली आणि त्यानंतर काही वेळातच तिने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले.


पोलिसांनी या प्रकरणात एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमित प्रजापती, शिवा मदेसिया, राकेश पाल आणि कृष्णा गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवले आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध विरार पोलीस सध्या घेत आहेत.


या घटनेने महाविद्यालयीन प्रेमसंबंधांमधील धोक्याचा आणि ब्लॅकमेलिंगच्या गंभीर परिणामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

ED Raids : मुंबई-वडोदरा येथील 7 ठिकाणी ईडीची छापेमारी; बिलपावर लिमिटेड कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई

मुंबई/वडोदरा : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई

Palghar Crime : भावाने फोन केला, प्रतिसाद नाही; फ्लॅट उघडताच धक्कादायक दृश्य, पालघरमध्ये ३० वर्षीय महिलेचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातील सातपती रोड परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

Pune Crime : ‘बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा माग’चा तगादा; वाकडमध्ये ३२ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Pune Crime News : दिघीतील 1.15 कोटींच्या घरफोडीचा 24 तासांत छडा; 2 अल्पवयीन ताब्यात, सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

पुणे : दिघी परिसरातील एका सोसायटीत झालेल्या तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांच्या घरफोडीचा तपास दिघी पोलिसांनी अवघ्या 24