Pune Crime News : दिघीतील 1.15 कोटींच्या घरफोडीचा 24 तासांत छडा; 2 अल्पवयीन ताब्यात, सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

पुणे : दिघी परिसरातील एका सोसायटीत झालेल्या तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांच्या घरफोडीचा तपास दिघी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी 757 ग्रॅम सोन्याचे आणि 640 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे. (Pune Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 ऑगस्टदरम्यान दिघी परिसरातील एका बंद घरात घरफोडी झाली होती. घरातील मौल्यवान दागिने चोरीला गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तपासाला सुरुवात केली. (Crime News)



तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यासोबतच गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. तपासाची दिशा योग्य लागल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Pune News)


यानंतर पोलिसांनी तपास पुढे नेत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना बाल न्याय प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी येरवडा येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


या कारवाईमुळे घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा कमी वेळेत तपास लावण्यात पोलिसांना यश आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विनायक पाटील, श्रीनिवास कामुनी, आबा कटापाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मोठ्या किमतीचा चोरीचा मुद्देमाल तातडीने हस्तगत केल्याबद्दल दिघी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. ( Dighi Robbery)


Comments
Add Comment

Mumbai Metro 7A : MMRDA चा अजब कारभार! २६० कोटींचा मेट्रो पूल आता पाडणार? २.५ मीटरच्या उंचीने काम अडचणीत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Food Poisoning : बापरे! चटपटी चटणी आणि गरमागरम मोमोज खाल्ले अन् 16 जण थेट रुग्णालयात पोहचले

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर 16 जणांना

Parel Chinchpokli Tension : ईद मिलादच्या मिरवणुकीदरम्यान परळ-चिंचपोकळीत तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त, Video Viral

मुंबई : ईद मिलाद-उन-नबीच्या (Eid Milad) मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ-चिंचपोकळी परिसरात दोन गटांमध्ये वाद

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

Mumbai Airport T1 Redevelopment : मुंबई विमानतळाचा T१ टर्मिनल होणार बंद; फ्लाइटसाठी नवी मुंबई विमानतळाचा पर्याय

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T१ टर्मिनलच्या पुनर्विकासाची तयारी सुरू

Ankit Baliyan Murder : जिमबाहेर थरार! प्रसिद्ध हरियाणवी गायक अंकित बलियानची गोळ्या झाडून हत्या; परिसरात प्रचंड खळबळ

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली येथे हरियाणवी संगीत क्षेत्रातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांची गोळ्या