Palghar Crime : भावाने फोन केला, प्रतिसाद नाही; फ्लॅट उघडताच धक्कादायक दृश्य, पालघरमध्ये ३० वर्षीय महिलेचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातील सातपती रोड परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूजा मिश्रा असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती चंदन मिश्रा सध्या बेपत्ता आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पूजा मिश्रा या सातपती रोड परिसरातील घोडेला गार्डनजवळील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०१मध्ये पतीसोबत राहत होत्या. त्यांच्या लग्नाला सुमारे सहा वर्षे झाली होती. पूजा एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.



२२ ऑगस्ट रोजी रात्री पूजा यांचा भाऊ प्रदीप कुमार मिश्रा यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला फोनला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे भाऊ सुरतहून पालघरला आला. घरी पोहोचल्यानंतर फ्लॅट बाहेरून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याचवेळी घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्याला संशय आला. त्याने तातडीने ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. फ्लॅटचे कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता पूजा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पूजाचा पती चंदन मिश्रा हा घटनेनंतरपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.



पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून, पूजांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूमागे घातपात आहे का, हा प्रश्न उपस्थित होत असला तरी पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. पतीची भूमिका आणि मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

ED Raids : मुंबई-वडोदरा येथील 7 ठिकाणी ईडीची छापेमारी; बिलपावर लिमिटेड कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई

मुंबई/वडोदरा : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम