Eknath Shinde : 'गुवाहाटी' उठावाची खरी स्क्रिप्ट माझ्याकडेच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; 'पुस्तक लिहायचं तर मला विचारूनच लिहावं लागेल!'

मुंबई : शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी करून 'गुवाहाटी' (Guwahati) गाठण्याच्या आणि त्यानंतर सत्तेत परतण्याच्या घटनेमागील 'खरी कथा' फक्त आपल्यालाच माहीत आहे, असे सूचक विधान (Suggestive Statement) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Eknath Shinde) यांनी केले आहे. भविष्यात यावर पुस्तक लिहिणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या 'दाही दिशा' या पुस्तक प्रकाशन समारंभात (Book Launch Event) एकनाथ शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की, "शिवसेनेत उठाव करून आम्ही गुवाहाटीला पोहोचलो आणि तिथून परत आलो. यातील वरवरची कथा सगळ्यांना माहीत आहे. पण जर पुस्तक लिहायचे असेल, तर खरी कथा मलाच माहीत आहे. त्यासाठी माझ्याशी बोलावे लागेल." यावेळी शिंदे यांनी विरोधकांनाही त्यांच्या शैलीत जोरदार टोला लगावला, "राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत. काही लोकांची आपल्यावर वाईट नजर आहे." शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य करत हिंदीतून केलेली शायरी चांगलीच चर्चेत राहिली. ते म्हणाले, "बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन मे पडेगा फिर से पाला, लेकिन महायुती के गले मे ही पडेगी विजय की माला." या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), मराठी भाषा विभागमंत्री उदय सामंत (Uday Samant), अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf), आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी (Milind Joshi) आदी मान्यवर उपस्थित होते.



डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या 'दाही दिशा' पुस्तकाचे प्रकाशन


वक्त्यांच्या मते, 'समाजात अन्याय दिसला की तिथे धावून जाणे, दुर्बलांना आधार देत विकासाचा मार्ग दाखवणे' या तत्त्वाचे डॉ. गोऱ्हे हे जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी लिहिलेले 'दाही दिशा' हे पुस्तक म्हणजे त्यांच्या संघर्षाचा आणि विचारांचा नकाशा आहे. हे पुस्तक गोऱ्हे यांच्या संघर्ष, संवेदनशीलता आणि समाजसेवेच्या प्रवासाचा एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे. हा प्रवास केवळ राजकीय नसून, सामाजिक जागृतीचा प्रवास आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 'दाही दिशा' हे केवळ साहित्यिक काम नसून, महिलांच्या, वंचितांच्या व शोषितांच्या आवाजाला दिशा देणारे महत्त्वपूर्ण कार्य आहे, असे गौरवोद्गार याप्रसंगी काढण्यात आले.



'आरक्षण मिळाले, पण संरक्षण नाही'; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्पष्ट मत


डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या राजकीय स्थानावर भाष्य करताना आरक्षण आणि संरक्षण या मुद्द्यांवर आपले परखड मत मांडले. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व्यक्त करत असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. गोऱ्हे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच; पण 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत." त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे यांच्या महिलाभिमुख (Women-centric) धोरणांचे कौतुक केले. राजकारणात महिलांना स्थान मिळाले असले तरी, त्यांच्या सुरक्षिततेचे व सक्षमीकरणाचे काम अजूनही बाकी असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्यांनी थेट आणि महत्त्वाचे विधान केले: "आरक्षण मिळाले; पण संरक्षण नाही. त्यासाठीचा संघर्ष अजून सुरू आहे." आपल्या 'दाही दिशा' या पुस्तकातील आशयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, १९९५ ते २००५ या कालखंडातील महिला चळवळीतील संघर्ष, महत्त्वाचे धोरणे (Policies) आणि अनुभव त्यांनी या पुस्तकात प्रामाणिकपणे मांडले आहेत. डॉ. गोऱ्हे यांच्या या स्पष्ट विधानामुळे महिलांच्या समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.



Comments
Add Comment

सहकारी गृहनिर्माण संस्थाना न्यायालयाचा दिलासा! आता खासगी विकासकाची निवड केल्यास 'एनओसी'ची गरज भासणार नाही

मुंबई: इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाविषयी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांनी बहुमताने खासगी विकासकाची निवड

Monorail Accident : 'ट्रॅक सोडून बाहेर'! वडाळा स्थानकाजवळ मोनोरेलचा भीषण अपघात; पहिला डबा खांबांवरच अडकला, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईच्या मोनोरेल सेवेला (Mumbai Monorail Service) लागलेले अपघातांचे ग्रहण काही सुटताना दिसत नाहीये. आज बुधवारी सकाळी

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून चार टक्के व्याज सवलत

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश मुंबई  : महाराष्ट्रातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायाशी

विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत

कुपर रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्दयानंतर महापालिका आरोग्य विभागाला जाग, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वच्छता पंधरवडा

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता ही आता चिंतेचा विषय ठरला आहे. कुपर