जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि प्रशिक्षण करणे ही अतिशय महत्त्वाची कामं केली त प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी. अंतिम सामन्याच्या दिवशीही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करा आणि उत्तम खेळ करा. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा अशा स्वरुपाचं मार्गदर्शन मुझुमदार यांनी टीमला केलं. प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा हा गुरुमंत्र टीम इंडियासाठी लाभदायी ठरला. भारताने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला.


भारताच्या जगज्जेतेपदात अमोल मुझुमदार यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही भूमिका चोख बजावल्यानंतर सोमवारी ३ नोव्हेंबरच्या रात्री अमोल मुझुमदार त्यांच्या विलेपार्ले येथील घरी परतले. यावेळी त्यांचे घर ज्या सोसायटीत आहे तिथल्या रहिवाशांनी अमोल मुझुमदार यांचे जोरदार स्वागत केले. भारताला जगज्जेतेपद मिळवून देण्यामागे मुझुमदार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता त्यांच्या शेजाऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी मुझुमदार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.




माध्यमांसोबत संवाद साधताना अमोल मुझुमदार म्हणाले की, 'हे सारे अविश्वसनीय आहे! या जगज्जेतेपदाची विलक्षण अनुभूती समजायला थोडा वेळ जाईल.' तसेच या जगज्जेतेपदाची तुलना त्यांनी १९८३ च्या वर्ल्ड कप यशासह केली. त्या जेतेपदाने जशी भारतीय तरुणांना क्रिकेटपटू होण्याची प्रेरणा दिली, तशीच स्फूर्ती या विश्वचषकामुळे महिलांमध्ये येईल, असे ते म्हणाले. खेळाडूंविषयी बोलताना ते म्हणाले की, 'मी आणि हरमन खूप चर्चा वगैरे करत नाही. पण स्मृतीसह फलंदाजी, नियोजन याबद्दल खूप संवाद होतो. कामाबद्दल हरमनसोबत समन्वय आहेच. प्रशिक्षक आणि कर्णधाराचे नाते असेच असावे. त्यांच्यात मतभिन्नता नसावी. माझे आणि हरमनचे नेहमीच एकमत असते.'


महत्त्वाचे म्हणजे अमोल मुझुमदार विशेष परवानगी घेऊन घरी आले आहे. त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती माध्यमांना दिली. विशेष परवानगी घेऊन घरचे जेवण खाण्यासाठी घरी आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिवस बाहेर असल्यामुळे घरच्या जेवणाची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या पत्नीला जेवणात खास वरण भात आणि फिश फ्राय करायला सांगितल्याचेही ते म्हणाले. घरचा वरण भात आणि फिश फ्राय हे अतिशय आवडीचे पदार्थ असल्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले.

Comments
Add Comment

रोहित शर्मा पुन्हा अव्वल स्थानावर

दुबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (२६ नोव्हेंबर) पुरुषांची फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

गुवाहाटी : भारताच्या कसोटी संघाला दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत ४०८ धावांनी पराभूत करत मालिका २-०

भारताचा दारुण पराभव; गौतम गंभीरवर टीकेची झोड, राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाला गंभीर?

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्वीकारावा

घरच्या मैदानावर भारताचा पराभव; दक्षिण आफ्रिकेचा २-० ने कसोटी मालिकेत दणदणीत विजय

गुवाहाटी : गुवाहाटीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आणि दक्षिण आफ्रिकेनं ४०८

टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर, १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना

दुबई : आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी