मोहित सोमण: सुझलॉन एनर्जी लिमिटेड (Suzlon Energy Limited) कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात (Total Consolidated Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) थेट ५३९.०८% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २००.२० कोटींच्या तुलनेत या तिमाहीत निव्वळ नफा १२७९.४४ कोटींवर नफा पोहोचला आहे. ही कंपनीच्या इतिहासातील मोठे साध्य समजले जात आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर ८४.६९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील २०९२.९९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३८६५.५४ कोटींवर महसूल पोहोचला. प्रामुख्याने इंडिया वाईंड टर्बाइनने ५६५ मेगावॉट (MW) वीज निर्मिती केल्याने कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीने २५६ मेगावॉट वीज निर्मिती केली होती.
कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मध्येही दुप्पटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २९४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ७२१ कोटीवर ही वाढ झाली आहे. मात्र इयर ऑन इयर बेसिसवर खर्चातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १९१९.६५ कोटीवरून या तिमाहीत ३३३४.८३ कोटींवर खर्च गेला आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस ऑर्डर बुक ६.२ गिगावॅट ओलांडून ऑर्डर आवक (Order Inflows) चांगली राहिली ज्यामध्ये आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत २ गिगावॅटपेक्षा जास्त वाढीचा समावेश आहे ज्यामुळे आगामी तिमाहींसाठी महसूल मोठ्या प्रमाणात वाढला. कंपनीने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत १४८० कोटी रुपयांची एकत्रित निव्वळ रोख स्थिती नोंदवली. कर्मचारी प्रोत्साहनांचा भाग म्हणून, संचालक मंडळाने (Board of Director) तिमाहीत वेगवेगळ्या अनुदान चक्रांमध्ये ईएसओपी (ESOP) २०२२ योजनेअंतर्गत इक्विटी शेअर्सचे अनेक वाटप नोंदवले. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुझलॉनने देशांतर्गत पवन क्षेत्रातील मजबूत मागणी देखील नोंदवली, आहे . जी पवन टर्बाइनवरील जीएसटी ५% कमी करणे आणि भारतात चालू असलेल्या अक्षय क्षमता-विस्तार उपक्रमांसारख्या धोरणात्मक उपायांमुळे समर्थित आहे असे कंपनीने स्पष्ट केले.
कंपनी एक अक्षय ऊर्जा सोलूशन कंपनी आहे. प्रामुख्याने कंपनी पवन टर्बाइनच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. प्रकल्प नियोजन, स्थापना आणि मालमत्ता व्यवस्थापनासह सौर ऊर्जा सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. सप्टेंबर २०२५ पर्यंत, प्रवर्तकांकडे (Promoter) कंपनीत ११.७३% हिस्सा होता.
निकालावर भाष्य करताना सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले,'सुझलॉन शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित करणारी भविष्यासाठी तयार संस्था तयार करत आहे, जी गेल्या ११ तिमाहीत करोत्तर नफा, महसूल आणि ईबीटा या क्षेत्रातील आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीतून दिसून येते. आमच्या ग्राहकांनी आम्हाला विक्रमी ६.२ GW ऑर्डरबुक सोपवली आहे. प्रकल्प विकास आणि प्रकल्प अंमलबजावणीचे वेगळे करण्याची आमची रणनीती अंमलबजावणीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ करेल. २०४७ पर्यंत ४०० GW पवन क्षमतेच्या दीर्घकालीन दृश्यमानतेसह, मला विश्वास आहे की आम्ही बाजारपेठेत आघाडीवर राहू.'
दुपारी कंपनीचा शेअर १२.४६ वाजेपर्यंत २.५८% उसळत ६०.७७ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सकाळी सकाळी सत्राच्या सुरुवातीला शेअरमध्ये १ ते १.५०% वाढ झाली होती.