मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी २५ फेब्रुवारीला

मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी पर्यंत मांडला न गेल्याने आता स्थायी समिती अध्यक्षांची निवड होताच येत्या २५ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. शिक्षण समितीमध्ये शिक्षणासंदर्भातील अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुपारी स्थायी समिती अध्यक्षांना महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियोजित वेळेत अर्थसंकल्प मांडला न गेल्यामुळे आता स्थायी समिती आणि महापालिका सभागृहामध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्याची मुदत कलावधी नसेल. त्यामुळे स्थायी समिती आणि सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी महापालिका सदस्यांना मोठी संधी मिळणार आहे.


मुंबई महापालिकेचा मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प यंदा ३ ते ४ फेब्रुवारी रोजी मांडला जाणे अपेक्षित होते. परंतु महापालिका स्थापन न झाल्यामुळे तसेच महापालिका अधिनियमाचा आधार घेत अर्थसंकल्प पुढे ढकलला होता. त्यामुळे नियोजित वेळेत अर्थसंकल्प मांडला न गेल्यामुळे आता प्रशासनाने बनवलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने आता केवळ सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला गेला तरी त्याला केवळ मान्यतेची औपचारिकता असेल. त्यामुळे २८ ते २९ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीत मंजूर करण्याचे आणि महापालिका सभागृहात १० मार्च पूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी अर्थसंकल्प मांडण्याचे कोणतेही निर्बंध नसणार आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये अनौपचारिकत चर्चेसह अर्थसंकल्पीय चर्चेला नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे अधिक वेळ घेवू शकतात, तसेच मुदत कालावधी निश्चित नसल्यामुळे सभागृहातही या मुदत कालावधीचे निर्बंध नसतील. त्यामुळे सभागृहात महापौर रितू तावडे या अधिक काळ अर्थसंकल्पावर चर्चा घडवून आणत प्रशासनाला एप्रिलमध्येही सुधारीत अर्थसंकल्प मंजूर करुन देवू शकतात.


मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यापूर्वी प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मांडला होता. परंतु अता प्रशासक जावून महापालिका स्थापन होत शुक्रवारी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे येत्या बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीत दुपारी दोन वाजता महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे सन २०२६-२७चा अर्थसंकल्प नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर करतील.



एकाच दिवशी अर्थसंकल्प आणि सभागृहही


येत्या २५ फेब्रुवारी रोजी महापालिका अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्याच दिवशी महापालिका सभागृहही आहे. त्यामुळे स्थायी समितीत अर्थसंकल्प दुपारी मांडल्यानंतर महापालिका आयुक्तांचे भाषण संध्याकाळी चार ते साडेचार वाजता संपते. त्यामुळे त्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी अर्थसंकल्प आणि सभागृह असल्यामुळे नगरसेवक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडणार आहे.

Comments
Add Comment

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा