सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांची जागा ठरली

गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांना सभागृहात बसवून जागा केली निश्चित


मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आसनांवरून गोंधळ उडालेला असतानाच शुक्रवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची आसन व्यवस्था पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी ठरवून दिली.कोणत्या नगरसेवकांनी कुठे बसावे याची आसन व्यवस्था नगरसेवकांना ठरवून दिल्यामुळे आता शिवसेनेच्या नगरसेवकांची तरी सभागृहात बसताना अडचण होणार नाही.


मुंबई महापालिका सभागृहात २२७ अधिक ५ अशाप्रकारे तसेच अतिरिक्त नगरसेवकांची आसन व्यवस्था असूनही पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यास जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांना सभागृहात उभे राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर दुसऱ्या सभागृहातही हाच घोळ झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, गटनेते अमेय घोले, ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव तसेच यामिनी जाधव यांनी पुढाकार घेत आपल्या नगरसेवकांना सभागृहात कुठे आणि कसे बसावे याचे प्रत्यक्ष आसनांवर बसवून त्यांच्या जागा निश्चित करून दिल्या.


शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची जागा निश्चित झाल्यानंतर त्या निश्चित जागेतील आसनांवर ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांच्या क्रमवारीनुसार नगरसेवकांची आसनांची व्यवस्था निश्चित करून दिली. तसेच त्या त्या जागांवर यासर्व नगरसेवकांना बसायला लावून यापुढे या निश्चित केलेल्या आसनांवरच नगरसेवकांनी बसावे अशाप्रकारच्या सूचना शुक्रवारी प्रत्यक्षात सभागृहातील आसनांवर बसवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांकडून कोणत्याही प्रकारची सभागृहात बेशिस्तपणा होणार नाही तसेच त्यांना उभे राहता येवू नये याची काळजी स्वत: पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी घेतल्याचे दिसून आले. तत्पूर्वी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेवून त्यांना पक्षाच्यावतीने सूचना करण्यात आल्या. यामध्ये पक्षाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान