मोहित सोमण:अखेरच्या सत्रात आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात जबरदस्त घसरण झाली आहे. युएस व भारत व्यापारी करारावर अद्याप चित्र स्पष्ट न झाल्याने सेन्सेक्स ५१९.३४ अंकाने कोसळला असून आज ८३४५९.१५ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी निर्देशांक आज १६५.७० अंकाने घसरण झाल्याने २५५९७.६५ पातळीवर स्थिरावला आहे. प्रामुख्याने कालची मिडकॅपमधील तेजी काही अंकाने आज घसरली असली तरी दिवसभरात सर्वाधिक घसरण प्रामुख्याने स्मॉलकॅप, लार्जकॅप निर्देशांकात झाली आहे. याशिवाय आज बाजारातील अखेरच्या सत्रातील रॅली मेटल, मिडिया, आयटी शेअरने रोखले असून केवळ कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३९%) निर्देशांकात आज वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय सर्वाधिक घसरण आज प्रामुख्याने आयटी (१.०६%), रिअल्टी (०.७८%), मेटल (१.४४%) निर्देशांकात झाली आहे.
निफ्टी व्यापक निर्देशांकातही (Nifty Broad Indices) सगळ्याच निर्देशांकात आज घसरण झाली. स्मॉलकॅप १०० (०.८२%), स्मॉलकॅप ५० (०.८८%), मायक्रोकॅप २५० (०.७६%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आज दिवसभरातील अस्थिरता (Volatility) कायम राहिली असून त्यामुळे गुंतवणूकदारांच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर याचा नकारात्मक परिणाम झाला. डॉलरच्या तुलनेत रूपयात मोठ्या प्रमाणात आज वाढ झाल्याने आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारकडून (Foreign Institutional Investors FII) अधिक रोख विक्री झाल्याची शक्यता आहे. आज बाजारात मोठ्या प्रमाणात 'सेल ऑफ' झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांबरोबरच घरगुती (Domestic) गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीत कपात केल्याची शक्यता आहे.
प्रामुख्याने बाजारात आगामी दरकपातीतील वक्तव्यांसह मिश्र आर्थिक तिमाहीतील निकालावर पुढील बाजाराची दिशा अवलंबून असेल. तसेच गेल्या आठवड्यात कच्चे तेल (Crude Oil), व सोन्याच्या किंमतीत मोठ्या हालचाली झालेल्या बाजारात पहावयास मिळाल्या होत्या त्यांची पुनरावृत्ती होऊ शकते. या अनिश्चितेत रूपयांसह डॉलरच्या व्यापारातील अनिश्चितता वाढल्याने त्याचा फटका अंतिमतः भारतीय शेअर बाजाराला बसला. आशियाई बाजारातील चीनच्या उत्पादन क्षेत्रातील कमकुवत आकडेवारी व घटलेली निर्यात तर दुसरीकडे चीनमधील देशांतर्गत मजबूत मागणी यामुळे आगामी भारत व युएस यांच्यातील व्यापारातील प्रश्नासह चीन व अमेरिका यांच्यातील आगामी टॅरिफ बोलणी आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टीसह इतर निर्देशांकात प्रभावी ठरणार आहे. निर्देशांकांनी 'फंडामेटल' मजबूतीमुळे सकारात्मकता दर्शविली असली तरी सत्रादरम्यान, ३१८१ व्यवहार करणाऱ्या समभागांपैकी १०३४ समभागांनी वधारला, तर २०६२ समभागांनी घसरण नोंदवली आणि ८५ समभाग स्थिर राहिले. आज ७५ समभागांनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. दरम्यान, ८१ समभागांनी ५२ आठवड्यांचा नीचांक (All time Low) गाठला आहे.
आजच्या बाजारातील घसरलेल्या निर्देशांकामुळे नका बुकिंग (Profit Booking) झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. युरोपियन बाजारातील एफटीएसई (१.१३%), सीएसी (१.६४%), डीएएक्स (१.७५%) निर्देशांकात या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.९१%) वगळता इतर दोन एस अँड पी ५०० (०.१७%), नासडाक (०.४३%) बाजारात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली आहे. गिफ्ट निफ्टी (१.०२%), निकेयी २२५ (१.०७%), हेंगसेंग (०.७३%), कोसपी (२.४३%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ 3M India (१६.८९%), हिताची एनर्जी (१४.१६%), सिटी युनियन बँक (९.५८%), ज्योती सीएनसी ऑ एटो (७.२४%), टीबीओ टेक (६.१३%),एमआरपीएल (४.३५%), अलेंबिक फार्मा (३.९५%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.४७%),निवा बुपा हेल्थ (३.१६%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण ब्लू जेट हेल्थ (१०%), रिलायन्स पॉवर (३.३७%), होम फर्स्ट फायनान्स (४.६९%), एनसीसी (३.८८%), सोलार इंडस्ट्रीज (३.७९), पीव्हीआर आयनॉक्स (३.६४%), एथर एनर्जी (३.५४%), सीडीएसएल (३.४१%), एनबीसीसी (३.१४%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' कमकुवत जागतिक संकेत आणि विशेषतः आयटी, धातू आणि वीज क्षेत्रातील व्यापक विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीला सुरुवात झाली. सुट्टीच्या काळात कमी झालेल्या आठवड्यापूर्वी गुंतवणूकदारांचा उत्साह मंदावला. अमेरिकेच्या बाँड उत्पन्नात वाढ आणि फेडकडून दर कपातीची अपेक्षा कमी झाल्यामुळे, जोखीम घेण्याची क्षमता कमी झाल्यामुळे, एफआयआयने सलग चौथ्या सत्रात विक्रीचा सिलसिला वाढवला. तरीही, भारताचे मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स लवचिक राहिले आहेत, मजबूत उत्पादन पीएमआय आणि मजबूत जीएसटी संकलन- अलिकडच्या कर कपात असूनही आर्थिक गती कायम ठेवत असल्याचे आणि येणाऱ्या तिमाहीत कमाईच्या सुधारणांना पाठिंबा देत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की गुंतवणूकदार पुढे जाण्याच्या ट्रेंडमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा करून बाय ऑन डिप्स धोरणाचा वापर करत राहतील.'
आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर विश्लेषण करताना करताना अशिका स्टॉक सर्विसेसचे मुख्य व्यवसाय अधिकारी राहुल गुप्ता म्हणाले आहेत की,' मंगळवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये अस्थिर सत्र दिसून आले कारण साप्ताहिक समाप्तीपूर्वी व्यापारींनी त्यांच्या पोझिशन्स उलटवल्या. निफ्टी २५६५०-२६००० पातळीच्या अरुंद बँडमध्ये चढ-उतार झाला आणि अखेर २५९०० पातळीच्या जवळ किंचित खाली आला, जो मिश्र जागतिक संकेतांदरम्यान सावधगिरीचा इशारा दर्शवितो. क्षेत्रनिहाय, आयटी, बँकिंग आणि एफएमसीजी समभागांनी भावनेवर परिणाम केला, तर धातू आणि रिअॅल्टी यांनी व्यापक बाजाराला निवडक आधार दिला.
तांत्रिक आघाडीवर, निफ्टीला २६००० पातळीच्या जवळ कडक प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे, तर तात्काळ आधार २५६०० पातळीवर आहे. या पातळीच्या खाली एक निर्णायक हालचाल २५३५० पातळीपर्यंत घसरण वाढवू शकते, तर २६००० पातळीच्या वर ब्रेकआउटमुळे २६२००-२६३०० पातळींपर्यंत शॉर्ट-कव्हरिंग रॅली होऊ शकते.
डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, चालू साप्ताहिक समाप्तीसाठी कमाल वेदना २५९०० पातळीवर आहे, जी या झोनभोवती एकत्रित होण्याची शक्यता दर्शवते. पुट रायटर्स २५८०० आणि २५९०० स्ट्राइकवर सक्रिय होते, तर कॉल रायटिंग २६००० वर लक्षणीय राहिले, ज्यामुळे नजीकच्या काळात वाढीच्या गतीला मर्यादा पडतील.एकंदरीत, निफ्टी २५६००-२६००० च्या दरम्यान रेंज-बाउंड ट्रेडिंग करेल अशी अपेक्षा आहे, जागतिक डेटा रिलीज आणि आगामी देशांतर्गत उत्पन्न घोषणांपूर्वी अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' सत्राची सुरुवात रुपयाने मजबूत पातळीवर केली, सुमारे ०.३० रुपयांच्या वाढीसह ८८.४० च्या जवळ उघडली, कदाचित हस्तक्षेपामुळे त्याला पाठिंबा मिळाला. तथापि, सत्र पुढे सरकत असताना सुरुवातीचा आशावाद मावळला, पुन्हा विक्रीच्या दबावामुळे रुपया ८८.६३ च्या जवळ बंद झाला. सततच्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) च्या बाहेर जाण्यामुळे आणि सावध बाजारातील भावनांमुळे पुनर्प्राप्ती अल्पकाळ टिकली. पुढे जाऊन, रुपयाची हालचाल अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे, RBI हस्तक्षेप कमी पातळीच्या आसपास आधार देईल, तर विक्रीचा दबाव वाढ मर्यादित करू शकेल. रुपयाची अपेक्षित व्यापार श्रेणी ८८.२५-८८.९० दरम्यान आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकन सरकारच्या चालू शटडाऊनमुळे मर्यादित डेटा रिलीझमध्ये अमेरिकन फेडच्या भविष्यातील व्याजदर कपातीबद्दल अनिश्चिततेमुळे आणि मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या किमती १२०००० पातळीच्या जवळ गेल्या काही काळासाठी नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर, सोन्याच्या किमती आणखी ५०० रुपयांनी घसरून १२०९५० रुपयांवर आल्या. अमेरिका-चीन व्यापार चर्चेच्या आसपासच्या सकारात्मक घडामोडींचा परिणाम बुलियन भावनांवरही झाला. पुढील प्रमुख घटक म्हणजे फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांची भाषणे असतील, जी दराच्या दृष्टिकोनावर संकेत देऊ शकतात. सोन्याचा भाव ११८५०० ते १२४००० रुपयांच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'