भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. यात मुंबई सर्वात खालच्या क्रमांकावर असून दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या सर्वात अस्वच्छ शहरात मुंबई ३३ व्या स्थानी आली आहे.


सर्वेक्षण यादीत मदुराई सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजे ४०व्या स्थानावर आहे. त्यानंतर लुधियाना (३९), चेन्नई (३८), रांची (३७), बंगळुरु (३६),धनबाद (३५) आणि फरीदाबाद (३४) अशा क्रमाने शहरांची यादी जाहीर केली आहे. तर प्रदुषणात अग्रेसर असलेले दिल्ली स्वच्छतेमध्येपण मागेच आहे. कारण सर्वेक्षण यादीत दिल्ली ३१व्या क्रमांकावर आहे.


अहवालानुसार गुजरातचे अहमदाबाद हे शहर स्वच्छतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भोपाळ, लखनऊ, जयपूर, जबलपूर ही शहरे टॉप फाईव्हमध्ये आहेत. तर हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, पुणे, विशाखापट्टणम, आग्रा सारखी अन्य शहरे देखील स्वच्छतेच्या यादीत अग्रेसर आहेत.


रँकिंग कशी तयार केली ?


स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२०२५ मध्ये रँकींगचे अनेक पॅरामीटर निश्चित केले गेले. त्यात साफसफाई, कचरा व्यवस्थापन, सॅनिटेशन, वापर होणाऱ्या पाण्याचे नियोजन, वैद्यकीय कचऱ्याचे नियोजन यांचा समावेश होता. तसेच मूल्यांकनामध्ये निवासी आणि व्यावसायिक विभाग, सार्वजनिक जागा, शाळा, झोपडपट्ट्या, पाण्याचे स्रोत आणि पर्यटन क्षेत्राचा समावेश केला गेला होता.


Comments
Add Comment

आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त मृतांचे आधार क्रमांक केले निष्क्रीय

मुंबई : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही

मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या

वाळू माफियांवर महसूलमंत्र्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

मुंबई : गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई

न्यूमोनियामुळे श्वसनप्रणाली बंद झाल्याने ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील

मुंबईत दुबार, तिबार... १०३ बार मतदार

मुंबईत ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे दुबार नोंद दुबार मतदारांची एकूण संख्या ११ लाख ०१ हजार दुबार मतदारांचा