मेट्रो १' तात्पुरती विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मेट्रो- १' सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत झाली. 'मेट्रो १'च्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना, दुरुस्ती करून काही मिनिटांत 'मेट्रो १' ची सेवा पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास 'मेट्रो १'ची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली. मात्र यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.


मुंबईतील घाटकोपर- वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो १ ची वाहतूक सेवा सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. अंधेरी स्थानकावर एका ट्रेनमध्ये झालेल्या बिघाडामुळे दुसऱ्या ट्रेनच्या मदतीने बिघाड झालेल्या ट्रेनला ओढण्यात आले. मात्र, तांत्रिक बिघाडाचे कारण कळू शकेलेले नाही. हा तांत्रिक बिघाड कार्यालयीन वेळेत झाल्यामुळे घाटकोपर, चकाला स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. मेट्रोची सेवा साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती. वर्सोवा- घाटकोपर दरम्यान सुमारे ४५ मिनिटे मेट्रो नव्हती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, सायंकाळी मेट्रोमध्ये मुंबईतील लोकल इतकीच गर्दी असते. त्यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नोकरदारांची तारांबळ उडाली. परंतु, दुरुस्ती केल्यानंतर मेट्रो सेवा सुरळीत झाली.


यापूर्वी २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी मेट्रो-७ मार्गिकेवर गुंदवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला ओव्हरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यामुळे मेट्रो-७ रेडलाईन मार्गावर गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी मेट्रो दोन तासांपासून खोळंबल्याने आणि मेट्रो वेळेत येत नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना अडचणींचा सामना करावा लागला होता. यानंतर ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो- ३ मार्गिकेवर धावणाऱ्या गाडीत अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. मेट्रो गाडीतून ठिणग्या उडाल्या, धूर आला आणि जळल्याचा वास येऊ लागला. यामुळे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मेट्रो गाडी सांताक्रुझ मेट्रो स्थानकावर आणून प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले आणि दुसऱ्या गाडीतून पुढे नेले. यादरम्यान मेट्रो ३ मार्गिकेवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.


काही वेळानंतर सेवा पूर्ववत करण्यात आली होती. तर मेट्रोसह मोनो रेल्वेही अनेकदा बंद पडल्याचे समोर आले आहे. १९ ऑगस्ट २०२५ रोजीही चेंबूर ते भक्ती पार्क म्हैसूर कॉलनीजवळ मोनो रेल बंद पडली होती. मोनो रेलच्या आतील वीज पुरवठा खंडीत झाला होता, त्यामुळे एसी देखील बद पडली होता. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानानंनी सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल ५८२ प्रवासी बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवास करत होते. तर पुन्हा २१ ऑगस्ट २०२५ रोजी देखील मोनो रेल १५ मिनिटांसाठी बंद पडली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

Comments
Add Comment

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

निवडणूक आयोग 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं'! राज ठाकरेंचा हल्लाबोल

पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत

बॅगच्या अस्तरमध्ये लपवले होते ८७ लाख; दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक!

मुंबई कस्टम्सची मोठी कारवाई; विदेशी चलनाचा मोठा साठा जप्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी