बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय क्रूर आणि संतापजनक प्रकार घडला आहे. अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये झालेला हा भीषण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. अपार्टमेंटमधील एका मोलकरणीने मालकाच्या मालकीच्या कुत्र्याच्या पिल्लाची लिफ्टमध्ये हत्या केली. गुफी (Goofy) नावाच्या या कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू ३१ ऑक्टोबरच्या दुपारी झाला. आरोपीची ओळख पटली असून, तिचं नाव पुष्पलता आहे. ती राशी पुजारी यांच्याकडे कामाला होती. या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेण्याचं काम पुष्पलता यांच्याकडेच होतं. मात्र, तिने गुफीला लिफ्टमध्ये आपटून आपटून मारले. या घटनेमुळे बंगळुरूतील नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाची मोठी लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट जिल्ह्यामध्ये १४ लाख रुपयांचे इनाम असलेल्या ...
खोटी कहाणी सांगूनही मोलकरणीची क्रूरता CCVT फुटेजमुळे उघड
कुत्र्याचे पिल्लू अचानक कोसळले आणि त्याचा मृत्यू झाला, अशी दिशाभूल करणारी बतावणी पुष्पलता यांनी मालकिणीसमोर केली. मात्र, मालकीण राशी पुजारी (Rashi Pujari) यांना संशय आल्याने त्यांनी इमारतीत असलेल्या लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. फुटेज पाहिल्यानंतर पुष्पलता यांचे भांडं फुटले आणि लिफ्टमध्ये झालेला सगळा प्रकार उघडकीस आला. फुटेजमध्ये पुष्पलता अतिशय निर्घृणपणे पिल्लाला आपटताना स्पष्टपणे दिसत होती. सीसीटीव्ही फुटेज हेच या क्रूर प्रकारातील सर्वात मोठे पुरावे ठरले असून, त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रूर कृत्याचा पर्दाफाश; मोलकरीण पुष्पलता फरार
बंगळूरूतील कुत्र्याचे पिल्लू 'गुफी' याच्या क्रूर हत्येप्रकरणी मालकिण राशी पुजारी यांच्या मैत्रिणीने श्रद्धा गौडा यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून घटनेची माहिती दिली आहे. गौडा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, आरोपी मोलकरीण पुष्पलता हिने सुरुवातीला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. "ती गुफीचा निष्प्राण देह खेचत घेऊन रपेट मारून परतली. तिला तिच्या कृत्याचा जराही पश्चात्ताप नव्हता." पुष्पलता हिने राशी पुजारी यांना "गुफी अचानक कोसळला आणि मरण पावला," असे खोटे सांगितले. दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहिल्यावर तिच्या क्रूर कृत्याचा 'पर्दाफाश' झाला. लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत पुष्पलता पिल्लाला जोरात फेकताना आणि बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी राशी पुजारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुष्पलता गेल्या दीड महिन्यापासून राशी यांच्या घरात काम करत होती. पिल्लाच्या हत्येनंतर ती फरार झाली आहे. पोलिसांनी पुष्पलता विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कलमानुसार ती दोषी आढळल्यास तिला ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड होऊ शकतो.
पोलिसांकडून 'सर्च ऑपरेशन'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा शोध (Search for the accused) सुरू आहे. यासाठी पोलिसांकडून 'सर्च ऑपरेशन' राबवले जात आहे. ती लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे बंगळूरमध्ये यापूर्वी घडलेल्या एका क्रूर घटनेची आठवण झाली आहे. जून महिन्यात महादेवपुरा परिसरात एका महिलेने तिच्या लॅब्रेडॉर कुत्र्याची हत्या करून त्याचा मृतदेह अनेक दिवस फ्लॅटमध्ये लपवून ठेवला होता. ही घटना 'जादूटोण्याशी संबंधित' असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्या घटनेतील आरोपी त्रिपर्णा नाईक ही पश्चिम बंगालची रहिवासी होती. बंगळूर शहरात प्राणी क्रूरतेच्या अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.