मुंबई : निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरे, उद्धव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते करत आहेत. मविआचे नेते मुद्दाम हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख करतात. हा एक प्रकारचा व्होट जिहाद आहे. "लोकसभेत आम्हाला विजय मिळाला हे महाविकास आघाडीने मांडले. महाविकास आघाडीला दोन कोटी ५० लाख मते मिळाली. आम्हाला मिळाली दोन कोटी ४८ लाख मते म्हणजे अंतर होते दोन लाखांचे! त्याच लोकसभा निवडणुकांमधील ३१ विधानसभा मतदारसंघांची यादी पाहिली. या मोजक्या ३१ विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक मुसलमान दुबार मतदार सव्वादोन लाख आहेत. मग तुम्ही व्होट चोरी केली ? असा प्रश्न मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मतदार याद्या शुद्ध हव्या असतील तर प्रामाणिकपणे SIR प्रक्रियेला जाहीर पाठिंबा द्या आणि निवडणूक आयोगाला त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू द्या. दुटप्पीपणाने वागणे टाळा; असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.
दुबार नावे नसती तर तुमचा निकाल काय लागला असता ? असा प्रश्न विचारत शेलार यांनी मविआ आणि राज ठाकरेंना हवे असल्यास आणखी पुरावे देईन; असेही जाहीर केले. यासाठीच मविआच्या मतदारसंघांतील मतदारयाद्यांचा अभ्यास करत असल्याचंही आशिष शेलार म्हणाले. रोहित पवार निवडून आले त्या मतदारसंघात पाच हजार मुसलमान दुबार मतदार आहेत. नाना पटोले हे साकोलीतून २०८ मतांनी निवडून आले आणि त्याच मतदारसंघात ४०० पेक्षा जास्त मुसलमान दुबार मतदार आहेत. मग मविआचे आमदार राजीनामा देणार का ? असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
आव्हाडांच्या मतदारसंघात ३० हजार तर मुंबादेवीत ११ हजार आणि मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्या मतदारसंघात १७ हजार मुसलमान दुबार मतदार आहेत. दुबार मतदार बडवणार हे हिंदू व दलित मतदारांची नावे घेऊन सांगणार. वांद्रे पूर्व पण आहे. यातील दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्याय का ? त्यांची आरती ओवाळायची का ? धुळ्यात लोकसभा निवडणुकीत तीन हजार मतांनी आमचा पराभव झाला. बीडमध्ये ६७ हजार दुबार आढळले आणि पंकजा मुंडेंचा पराभव सहा हजार मतांनी झाला. निवडणुकीत सोळा हजार मतांनी वर्षा गायकवाड निवडून आल्या तिथे ३९ हजार दुबार मतदार आहेत. मग निवडून आलेले मविआचे सर्व नेते आता राजीनामा देणार आहेत का ? संजय पाटील यांचा उद्धव ठाकरे राजीनामा घेणार का ? राज ठाकरे भूमिका काय ? फक्त यादीत आढळलेल्या हिंदू दलित दुबार मतदारांविषयी बोलायचे आणि मुसलमान दुबार मतदारांवर पांघरुण घालायचे का ? असा रोखठोक सवाल मंत्री आशिष शेलार यांनी मविआ नेत्यांना आणि राज ठाकरेंना विचारला.
मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचे आमदार आणि त्यांच्या विजयी मतांची आघाडी तसेच त्या मतदारसंघातील दुबार मुसलमान मतांची यादीच सादर केली. ही यादी...
149 : मुंब्रा विधानसभा: जितेंद्र आव्हाड
30,601 दुबार मुस्लिम मते
254 : माळशिरस विधानसभा : उत्तम जानकर
4399 दुबार मुस्लिम मते
100 : घनसावंगी विधानसभा : राजेश टोपे
11,751 दुबार मुस्लिम मते
केवळ 2309 मतांनी येथे शिवसेना निवडून आली.
235 : लातूर शहर : अमित देशमुख
20,613 दुबार मुस्लिम मते
178 : धारावी : ज्योती गायकवाड
10,689 दुबार मुस्लिम मते
186 : मुंबादेवी : अमीन पटेल
11,126 दुबार मुस्लिम मते
57 : उत्तर नागपूर : नितीन राऊत
8342 दुबार मुस्लिम मते
162 : मालाड पश्चिम : अस्लम शेख
17,007 दुबार मुस्लिम मते
ते जिंकले 6227 मतांनी.
96 : परभणी : राहुल पाटील
13,313 दुबार मुस्लिम मते
156 : विक्रोळी : सुनील राऊत
3450 दुबार मुस्लिम मते.
किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती.
175 : कलिना : संजय पोतनीस
6973 दुबार मुस्लिम मते
जिंकले 5008 मतांनी
158 : जोगेश्वरी पूर्व : अनंत नार
6441 दुबार मुस्लिम मते
जिंकले 1541 मतांनी
29 : बाळापूर : नितीन देशमुख
5251 दुबार मुस्लिम मते
159 : दिंडोशी : सुनील प्रभू
5347 दुबार मुस्लिम मते
6182 मतांनी जिंकले
242 : धाराशिव : कैलास पाटील
11,242 दुबार मुस्लिम मते