Stock Market Update: तेजीचा 'अंडकरंट' असूनही शेअर बाजारात घसरण आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये मोठी घसरण जाणून घ्या आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. पहाटेला सुरूवातीच्या गिफ्ट निफ्टीतील तेजीची कल दिसत होता. मात्र वैश्विक अनिश्चितेमुळे आज शेअर बाजारात घसरण झाली आहे. प्रामुख्याने स्मॉल व लार्जकॅप शेअर्सच्या आधारे बाजारात घसरण झाली असली तरी मिडकॅप मधील किरकोळ तेजीने बाजारात आधार मिळाला आहे. सेन्सेक्स २९२.०६ अंकांनी व निफ्टी ६६.३५ अंकांनी घसरला आहे. सकाळच्या सत्रात व्यापक निर्देशांकात बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ स्मॉलकॅप १०० (०.५९%), स्मॉलकॅप ५० (०.७७%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर निफ्टी १०० (०.११%), निफ्टी २०० (०.०५%) निर्देशांकात किरकोळ घसरण झाली.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सकाळच्या सत्रात बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे. प्रामुख्याने आज भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ५.९४% उसळला असल्याने अखेरच्या सत्राबाबत अस्थिरता कायम राहू शकते. प्रामुख्याने यांचा सर्वाधिक प्रभाव लार्जकॅप निर्देशांकात राहू शकतो. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मिडस्मॉल हेल्थकेअर (०.८४%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४७%),पीएसयु बँक (१.२८%) निर्देशांकात वाढ झाली असून घसरण कंज्यूमर ड्युरेबल्स (०.६०%), आयटी (०.८४%), प्रायव्हेट बँक (०.३३%) निर्देशांकात झाली आहे.


सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ इंटलेक्ट डिझाईन (८.५४%), श्रीराम फायनान्स (५.७०%), नवीन फ्लुओ इंटरनॅशनल (५.०७%), एसबीएफसी फायनान्स (४.६६%), वी गार्ड इंडस्ट्रीज (४.३३%), बँक ऑफ बडोदा (४.१५%) या निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण झेंसार टेक्नॉलॉजी (५.२३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.६२%), ब्लू डार्ट एक्स्प्रेस (३.६५%), टाटा केमिकल्स (३.५२%), पजांजली फूडस (३.२२%), न्यू इंडिया अँन्शुरन्स (३.१८%), मारूती सुझुकी (२.८७%), जेके सिमेंट (२.१२%), कजारिया सिरॅमिक्स (२.०३%) निर्देशांकात झाली आहे.


आजच्या बाजार पूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्समध्ये ३८६० अंकांची आणि निफ्टीमध्ये ११५७ अंकांची तीक्ष्ण वाढ बाजाराला नवीन विक्रमी उच्चांक गाठण्यास मदत करू शकली नाही. नफा बुकिंग आणि एफआयआय पुन्हा विक्रेते वळले यामुळे तेजीचा विक्रमी उच्चांक गाठण्यास अडथळा निर्माण झाला. भारतात रॅलींवर विक्री करण्याच्या आणि इतर चांगल्या कामगिरी करणाऱ्या बाजारपेठांमध्ये पैसे वळवण्याच्या एफआयआय धोरणामुळे त्यांना भरपूर लाभांश मिळाला असल्याने, आताही तेच धोरण सुरू ठेवण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. या परिस्थितीत बदल तेव्हाच होईल जेव्हा आपल्याकडे भारतातील कॉर्पोरेट उत्पन्नात स्मार्ट बदल दर्शविणारे प्रमुख निर्देशक असतील.ट्रम्प - शी जिनपिंग शिखर परिषदेने अमेरिका-चीन व्यापार युद्धात केवळ तात्पुरती शांतता दिली, व्यापार करार नाही. संभाव्य अमेरिका-भारत व्यापार करारावर याचे परिणाम अद्याप दिसून येत आहेत.उद्योगातील एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे ऑटोमोबाईल्सची, विशेषतः लहान कारची सतत मागणी, जी आशावादी अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचे दिसून येत आहे. ऑटो शेअर्स लवचिक राहतील.'


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' गेल्या सलग दोन आठवड्यात २६१०० क्षेत्र ओलांडण्यात अयशस्वी झाल्यामुळे निर्माण झालेल्या टॉपिंग पॅटर्नमुळे घसरणीची परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे निफ्टी २५४०० पातळीच्या मार्गावर पोहोचला असे दिसते. तथापि, आठवड्याच्या सुरुवातीच्या कठीण परिस्थितीतून ऑसिलेटर बाहेर आले आहेत आणि ते २५७०० पातळीपासून जास्त घसरण न होता बुल्सना पुन्हा एकत्र येण्यास अनुमती देऊ शकतात.'

Comments
Add Comment

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच शरद पवारांकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी

मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

Iran-US-Israel War : अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे (Iran-US-Israel War) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार