अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आत ओढले जाऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.


नवी मुंबईतील सानपाडा येथून चार मित्र अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी पोहोण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोन तरुण शशांक सिंग (वय १९, रा. उलवे, उरण) व पलाश पखर (वय १९, रा. सानपाडा, नवी मुंबई) हे समुद्राच्या भरतीच्या प्रवाहात वाहून जात बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र रविवारी दुपारपर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध लागला नव्हता. स्थानिक मच्छीमारांची मदत पोलिसांनी घेत समुद्रात शोधमोहीम सुरू केली असून, कोस्ट गार्ड व आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही माहिती देण्यात आली आहे. भरती-ओहोटीच्या परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत असले, तरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील 'रिसर्च प्रोजेक्ट'ला मंजुरी

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर करणार संशोधन बीड : बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व