हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला असतानाच, कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या विनम्रतेने आणि संस्कारांनी सर्वांचं मन जिंकलं.


विजयानंतर हरमनप्रीतने सर्वप्रथम आपल्या कोच अमोल मुजूमदार यांची भेट घेतली आणि त्यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतला. मैदानावर घडलेला हा प्रसंग पाहून सर्वजण भारावून गेले. विजयानंतरही आपल्या गुरूंचा आदर राखणाऱ्या हरमनप्रीतच्या या कृतीने भारतीय संस्कारांचं दर्शन घडलं.


यानंतर विश्वचषक स्वीकारण्यासाठी ती व्यासपीठावर गेली असता, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर तिने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जय शाह यांनी तिला थांबवत “नको” असा इशारा दिला. या काही क्षणांच्या दृश्याने संपूर्ण स्टेडियममध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आणि सोशल मीडियावरही हरमनप्रीतच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव झाला.


थोड्याच वेळात हे भावनिक वातावरण जल्लोषात बदललं. हरमनप्रीतने ट्रॉफी उचलताच सहकाऱ्यांसोबत मैदानात भांगड्याचा जल्लोष सुरु झाला. फटाक्यांचा आवाज, आनंदाश्रू आणि अभिमानाची भावना, प्रत्येक क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला.


या विजयाने भारताच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. भारताने ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. शेफाली वर्माच्या दमदार ८७ धावा आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळी (५५ धावा, ५ बळी) यांनी विजयाची पायाभरणी केली. दक्षिण आफ्रिकेच्या Laura Wolvaardt हिने शतक झळकवलं, मात्र तिच्या या झुंजार खेळीनेही भारताचा विजय रोखू शकला नाही.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड