होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या आणि भारतापुढे वीस षटकांत १८७ धावा करण्याचे आव्हान ठेवले.
भारत - ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे बरोबरी साधण्यासाठी होबार्टमध्ये विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सहा, मिचेल मार्शने ११, जोश इंगलिसने एक, टिम डेव्हिडने ७४, मिचेल ओवेनने शून्य, मार्कस स्टोइनिसने ६४, मॅथ्यू शॉर्टने नाबाद २६, झेवियर बार्टलेटने नाबाद तीन धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, वरुण चक्रवर्तीने दोन, शिवम दुबेने एक बळी घेतला.