भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. हार्मोसिलो शहरातील एका सुपरमार्केटला लागलेल्या भीषण आगीत २३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत १० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.


ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा देशभरात ‘डे ऑफ द डेड’ हा पारंपरिक सण साजरा केला जात होता. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ कुटुंबं एकत्र येत असतानाच या दुर्घटनेमुळे आनंदाचे वातावरण शोकांतिकेत बदलले.

सोनारा राज्याचे अॅटर्नी जनरल गुस्तावो सालास यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मृत्यू विषारी वायूच्या श्वसनामुळे झाल्याची शक्यता आहे. आगीमुळे संपूर्ण इमारतीत दाट धूर पसरल्याने लोकांचा श्वास गुदमरला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकं पोहोचली आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे.


विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हार्मोसिलो नगरपालिकेनं मात्र हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


राज्यपाल अल्फोन्सो दुराजो यांनी सखोल तपासाचे आदेश दिले असून, “या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याने ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे,” असं ते म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावरून पीडित कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.


दरम्यान, मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लाऊडिया शीबनाम यांनी एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. “या भीषण आगीत आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रशासनाचं बचावकार्य सुरू आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.


सोनारा रेड क्रॉसच्या ४० सदस्यांनी आणि १० रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतलं आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून, अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; फिट झाल्यानंतर भारतात परतणार

सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

हिंदू पत्नीबद्दलच्या वक्तव्यामुळे व्हान्स यांच्यावर हिंदुफोबिक असल्याची टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सध्या

महापौरपदाचे उमेदवार झोहरान ममदानींनी मोदींवर केले गंभीर आरोप

न्यू यॉर्क : अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील महापौरपदासाठी (मेयर) ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. प्रचारावेळी

ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे 'टॅरिफ युद्ध' थंडावणार?

चीन अमेरिकेचे कृषी, ऊर्जा उत्पादन खरेदी करणार; फेंटॅनाईल संकटावर मदत करण्याचे आश्वासन ग्योंगजू (दक्षिण कोरिया):

पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका, अफगाणिस्तानच्या "या" निर्णयाला भारताचा पाठिंबा

काबुल : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानला धक्का दिला . आता

अमेरिका करणार अणवस्त्रांची चाचणी, रशियाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अमेरिका: रशियाने नुकतेच 'पोसायडन' नावाच्या आण्विक-शक्तीवर चालणाऱ्या अंडरवॉटर ड्रोनची चाचणी यशस्वी केल्याचे