मुंबई: पवईत एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यवर सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली. या कारवाईत रोहितचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असून, गुन्हे शाखेसमोर या चकमकीचे पुरावे गोळा करणे हे मोठे आव्हान असणार आहे. रोहितने राज्य सरकारच्या शिक्षण विभागावर फसवणुकीचा आरोप केला होता, त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
पवईच्या महावीर क्लासिक इमारतीमधील आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने १७ मुलांना ओलीस ठेवले होते. यावेळी मुलांना सोडवण्यासाठी स्टुडिओत शिरलेल्या सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहितवर गोळी झाडली. छातीत गोळी लागल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रँच) सोपवण्यात आली आहे.
ठाणे : कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. जखमी चालकाला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. चालकावर ...
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. रोहितवर गोळी झाडण्याची वेळ का आली ? छातीऐवजी इतरत्र गोळी झाडून त्याला रोखता आले नसते का ? क्यूआरटीला बोलावले असताना मुंबई पोलिस आत का शिरले ? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान गुन्हे शाखेसमोर आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक बारकाईने तपास करत आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी होणार?
रोहित आर्य हा शिक्षण विभागाच्या ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’ आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ या उपक्रमांशी जोडला गेला होता. रोहितचा आरोप होता की, "या दोन्ही उपक्रमासाठी सरकारने मी दिलेली संकल्पना वापरली. मात्र त्याचे श्रेय आणि पूर्ण पैसे दिले नाहीत." या आरोपात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच, शिक्षण विभागाकडून रोहितला काही पैसे येणे बाकी होते का ? हे तपासण्यासाठी रोहितच्या बँक खात्याचीही झाडाझडती घेतली जाणार आहे.