भरधाव पोलो कार थेट धडकली मेट्रोच्या खांबाला ; पुण्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,

पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक नियंत्रण गमावले आणि ती थेट मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन आदळली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला असून, दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे.


मृतांमध्ये यश प्रसाद भंडारी (23, थेरगाव) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (23, पिंपरीगाव) या दोघांचा समावेश असून हे दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या खुशवंत टेकवाणी याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, फूटेजमध्ये कार अतिवेगाने जाताना थेट खांबाला धडकताना दिसली . या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.


मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

डोक्याला पिस्तुल लावून भाविकांचे नऊ तोळे सोने लुटले

पाथर्डी : गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पाच ते सहा चोरट्यांनी नाशिक येथील भाविकांचे ९ तोळे सोन्याचे दागिने व

निषेध मोर्चा काढल्याबद्दल बाळा नांदगावकर यांच्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा

मुंबई : दक्षिण मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून