५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, इस्रायल-गाझा अशा युद्धांनी जगभरात तणाव असताना ५५ देशांच्या शक्तीशाली युद्धनौका आणि पाणबुड्या भारताच्या समुद्रात दाखल होणार आहेत. यात अमेरिका, रशियादेखील असणार आहे. जगाला भारताची ताकद दाखवण्याची वेळ आली असून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी केली जाणार आहे.


भारतीय नौदल फेब्रुवारी २०२६ मध्ये विशाखापट्टणम येथे तीन मोठे आंतरराष्ट्रीय सागरी कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करणार आहे. ‘मिलन २०२६’ हा बहुराष्ट्रीय नौदल युद्धसराव १९ ते २६ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सरावात ५५ देशांचे नौदल सहभाग घेणार आहेत. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी ‘हार्बर फेज’ नंतर, २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या उपसागरात पाणबुडीविरोधी, हवाई आणि अत्याधुनिक सागरी ऑपरेशन्सचा ‘सी फेज’ आयोजित केला जाईल.


अमेरिकेसोबतच रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांची नौदले आपली विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या भारताच्या दिशेने पाठविणार आहेत. भारताने या भव्यदिव्य आयोजनाची तयारी सुरु केल्याचे नौदलाचे उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी सांगितले. मिलन २०२६ या मुख्य सरावाव्यतिरिक्त, भारतीय नौदल आणखी दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे यजमानपद भूषवणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ताफ्याचे पुनरावलोकन केले जाईल. यात भारताची स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. सागरी सहकार्य वाढवण्यासाठी २००८ मध्ये स्थापन झालेल्या या ‘आयओएनएस’ परिषदेत नौदल प्रमुख एकत्र येऊन चर्चा करतील. या वेळी भारत २०२५ ते २०२७ साठी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.

Comments
Add Comment

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची

Venkateshwara Swami Temple : हादरवणारी दुर्घटना! व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Srikakulam) जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. येथील व्यंकटेश्वर