डांबरीकरणासाठी शहाड पूल पुन्हा बंद

वाहतूक बंदीमुळे वाहनचालकांना २० दिवस मनस्ताप


उल्हासनगर : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल पुन्हा ३ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत डांबरीकरणासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हे काम हाती घेणार असून, या काळात पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुलावरील परिस्थिती जैसे थे असल्याची वाहनचालकांकडून तक्रार केली जात होती. आता डांबरीकरणाचे काम होणार असल्याने पुन्हा २० दिवस वाहनचालकांसाठी कोंडीचे ठरणार आहेत.


उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने ठाणे वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यानुसार याबाबतची अधिसूचना जारी करून वाहनचालकांना माहिती दिली आहे.


प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कसे असतील याबाबत वाहतूक पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. यात अहिल्यानगरकडून माळशेजमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मुरबाडच्या वेशीवर बारवी डॅम फाटा येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग हा बारवी धरण रस्ता - बदलापूर रस्ता - बदलापूर - पालेगाव - नेवाळी नाका - मंलग रस्ता - लोढा पलावा/शिळ-डायघर रस्ता - पत्रीपूल - कल्याण मार्गे पुढे जातील.

Comments
Add Comment

मेहता–सरनाईक यांच्यात वर्चस्वाची लढाई

मीरा-भाईंदरमध्ये युतीची शक्यता धुसर भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे

कळव्यात भाजपची ५० टक्के जागांची मागणी

प्रचाराचा नारळ फुटला! पालिकेत युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची भूमिका ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या

नवीन वर्षात ठाणे मेट्रो-४ सुरू होणार

कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतचा प्रवास होईल सुलभ मुंबई : मेट्रो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शीव उड्डाणपुल समांतर उभारणार दोन पदरी पूल

ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल

नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू

१९० कोटींचा खर्च, २१ मजली भव्य बांधकाम नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशी येथील महत्त्वाचा

ठाणे महापालिका निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू

१९४२ केंद्रांवर ९७१० कर्मचारी तैनात ठाणे : ठाणे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच, सर्वच राजकीय पक्षांतील