क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian cricket women’s team) २०२५ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाल करत आहे. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता २ नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.


पण तुम्हाला माहीत आहे का ? पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये ७ महत्त्वाचे नियम वेगळे असतात! चला, जाणून घेऊया या दोन्ही खेळांतील काही प्रमुख फरक


पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी सामना ५ दिवसांचा असतो, तर महिलांसाठी कसोटी सामना ४ दिवसांचा असतो.


पुरुष कसोटी सामन्यात दररोज किमान ९० षटकांचा खेळ होतो, तर महिला कसोटीमध्ये दररोज किमान १०० षटके टाकणे बंधनकारक असते.


वनडे क्रिकेटमध्येही फरक आहे. पुरुषांच्या सामन्यात तीन ‘पॉवरप्ले’ असतात, तर महिला सामन्यात फक्त एकच ‘पॉवरप्ले’ दिला जातो.


पुरुषांच्या वनडे सामन्यात बाउंड्रीचे अंतर किमान ५९.४३ मीटर आणि जास्तीत जास्त ८२ मीटर असते. महिला सामन्यात हे अंतर किमान ५४.८६ मीटर आणि जास्तीत जास्त ६४ मीटर असते.


दोघांच्या ‘इन-सर्कल’च्या अंतरातही फरक आहे. पुरुष सामन्यात ३० मीटर तर महिला सामन्यात २५ मीटरचे अंतर असते.


चेंडूच्या वजनातही बदल असतो. महिला क्रिकेटमधील चेंडूचे वजन किमान १४२ ग्रॅम असते, तर पुरुष क्रिकेटमध्ये तो किमान १५६ ग्रॅमचा असतो.

Comments
Add Comment

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०