आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून भारतात सुलभ व्यवहार शक्य
मुंबई: पेटीएम (One 97 Communications Ltd.) या भारतातील अग्रगण्य मर्चंट पेमेंट्स आणि फिनटेक सेवा कंपनीने जाहीर केले आहे की,'यापुढे देशांतील एनआरआय (Non Residence Indian NRI) आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकासह पेटीएम अँपवर लॉगिन करून NRE किंवा NRO खात्यांद्वारे सहज युपीआय (UPI) पेमेंट्स करू शकतील.
या सुविधेमुळे एनआरआय वापरकर्ते आता भारतातील दुकाने, रेस्टॉरंट्स, व्यापारी, तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात. त्यांना आता आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवे किंवा चलन रूपांतरणाची गरज नाही. ते त्यांच्या खात्यांदरम्यान पैसे ट्रान्सफर करू शकतात किंवा कोणत्याही UPI ID किंवा UPI लिंक्ड मोबाइल नंबर वर त्वरित पैसे पाठवू शकतात. ही सेवा एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) च्या साहाय्याने सुरू करण्यात आली असून ती सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, यूएई, यूके, फ्रान्स आणि मलेशिया येथील भारतीयांसाठी उपलब्ध आहे असे पेटीएमने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
याविषयी बोलताना पेटीएम प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की,' भारतासाठी, भारतात तयार केलेल्या तंत्रज्ञानाने प्रत्येक भारतीयाला जोडण्याचे आमचे स्वप्न आहे. आता एनआरआयंना त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून पेटीएम UPI वापरण्याची परवानगी देणे ही त्या प्रवासातील पुढची पायरी आहे.'
एनआरआयंसाठी भारतात पेटीएमवर UPI सुरू करण्याची प्रक्रिया कशी असेल?
पेटीएम अँप डाउनलोड करा आणि उघडा
आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकाने लॉगिन करा
SMSद्वारे क्रमांक पडताळा करा आणि बँक खाते लिंक करून पेमेंट सुरू करा