नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'मोंथा' चक्रीवादळ (Montha Cyclon) आता निवळले आहे. परिणामी, छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या हवामानातील बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पंजाब : पंजाबच्या लुधियानामधील जगरांव येथे शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तेजपाल सिंग (Tejpal Singh) नावाच्या २६ वर्षीय कबड्डीपटूवर (Kabaddi ...
'तुळशीचं लग्न' झाल्याशिवाय पाऊस पाठ सोडणार नाही, मराठवाड्यात गडगडाटी वादळाची शक्यता
यंदाची नवरात्र आणि दिवाळी देखील पावसाने गाजवली. त्यामुळे, आता 'तुळशीचं लग्न' झाल्याशिवाय पाऊस एग्झिट घेणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी आणि संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठीचा अंदाज (Forecast) वर्तवला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या, २ नोव्हेंबरला, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पावसासह गडगडाटी वादळ (Thunderstorm) होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त (Above Average) राहण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातही नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवार, १ नोव्हेंबरनंतर मुंबईत कोरडे वातावरण अपेक्षित...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पाऊस सुरू होता. या पावसामुळे दिवाळीच्या काळातही वातावरणात गारवा जाणवत होता, तसेच प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली होती. मात्र, आता हवामान विभागाने महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर नंतर मुंबईतील हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पुढील काही दिवसांत मुंबईकरांना पावसापासून सुटका मिळणार असून, दिवसाच्या तापमानात आणि आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.