महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई

पंजाब : शस्त्र तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे.



सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या मोहाली येथून अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी आरोपींकडून १.९९ लाख रुपयांची रोकड, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबच्या खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. याच टोळीतील दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.




सिकंदरने २०२४ सालचा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला होता. तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करुन घेण्यात आले होते. मात्र लष्करातील नोकरी सोडून गेल्या काही महिन्यांपासून तो तस्करी करत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. यासाठी तो पंजाबमध्येच वास्तव्यास होता.

Comments
Add Comment

Top Stocks to Buy:अस्थिरतेचा फायदा नफा बुकिंगसाठी? कमाईसाठी ब्रोकरेजकडून १० शेअरची यादी जाहीर

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड या दोन

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

शेअर बाजारात 'युएस व्हेनेझुएला' सेन्सेक्स २०० व निफ्टी ४५ अंकांने कोसळला

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांने व निफ्टी ४५ अंकाने घसरला

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत