मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने २२ षटकांत एक बाद १४९ धावा केल्या आहेत. एलिसा हिली पाच धावा करुन क्रांती गौडच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाली आहे. फोबी लिचफिल्ड आणि एलिस पेरी मैदानावर आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या पहिल्या सेमी फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
आत दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात जो जिंकेल त्यांच्यात अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेशी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या दुसऱ्या सेमी फायनल यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जॉर्जिया वेयरहमच्या जागी सोफी मोलिनयु आणि कर्णधार एलिस हिलीच्या जागी जॉर्जिया वॉलला संधी दिली आहे. तर भारतीय संघात सुद्धा काही महत्वाचे बदल झाले आहेत. प्रतिका रावलच्या जागी शेफाली वर्माला संघात स्थान मिळाले आहे, ऋचा घोष आणि क्रांती गौड या उमा छेत्री आणि हरलीन देओलच्या जागी परतल्या आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ सामने झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलिया ने ११ सामने जिंकले आहेत, तर भारताने फक्त ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. १९७८ पासून दोन्ही संघांमध्ये एकूण ६० दिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा हा कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने ४९ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ११ सामने जिंकले आहेत.
आजचा सामना हा भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू झाला आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित होत असून जिओहॉटस्टारवर तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
ऑस्ट्रेलिया संघ : फोबी लिचफील्ड, एलिसा हिली (विकेटकीपर / कॅप्टन ), एलिसे पेरी, बेथ मुनी, एनाबेल सदरलैंड, एशले गार्डनर, ताहलिया मैकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट.
भारतीय संघ : शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, अमनजोत कौर, अमनजोत कौर, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर.