दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाभ्यासाचे महत्त्व आणखी वाढले आहे. हा योगाभ्यास करण्यासाठी क्लासला जाणे शक्य नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही घरच्या घरीच काही आसनं करून तणावमुक्त राहू शकता. ते कसं ? चला बघुया...


दररोज काही तास या आसनांसाठी दिल्यास शरीरावरील ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. चिंता, अस्वस्थता आणि मानसिक थकवा कमी करून दिवस अधिक सकारात्मक करू शकता.


कॅट काऊ पोज : मणक्याचा तणाव कमी करण्यासाठी उत्तम उपाय, या आसनात पाठीचा कणा वर खाली हलवून शरीरातील ताण कमी होतो. श्वसनावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले आणि लयीत हालचाल केली तर रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेला आवश्यक आराम मिळतो शिवाय लवचिकता वाढते.



बालासन : मनाला विश्रांती देणारे असं आसन. गुडघ्यांवर बसून हात पुढे ठेवावेत. हे असं शरीर आणि मन असा दोन्हींना शांती देते. पाठीचा ताण कमी होतो. खांदे सैलावतात आणि मनावरील ताण दूर होतो.



शवासन : संपूर्ण शरीराच्या विश्रांतीसाठी सर्वोत्तम आसन. पाठीवर झोपून शरीर शिथिल करा आणि श्वासावर लक्ष केंद्रत करा. हे आसन मन शांत ठेवण्यासाठी आणि स्थिरतेसाठी अतिशय प्रभावी आहे.



लेग्ज-अप-द-वॉल पोझ : एनर्जी साठवण्यास मदत करणारे आसन, पाठीवर झोपून पाय भिंतीवर टेकवण्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, हे आसन शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी मदत करतं .



पश्चिमोत्तानासन : हे आसन केल्याने पाठीचा कणा आणि हॅमस्ट्रिंग्स ताणते, यामुळे मानसिक शांतता मिळते. पचनशक्ती सुधारते.



वृक्षासन : हे आसन आंतरिक शांती आणि शांतता प्रदान करत, या आसनामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक संतुलन सुधारते. हे आसन स्नायूंना मजबूत करते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्थैर्य मिळते.


Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे