‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

मुंबई: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असून पुन्हा एकदा संगीताचा अनोखा उत्सव म्हणजे इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट! हा कार्यक्रम घेऊन आले आहे.  या नव्या हंगामात ९०च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करण्यात आला आहे.  जिथे जुन्या आठवणींना नव्या सुरांचा स्पर्श दिला जात आहे. देशभरातील उत्कृष्ट गायक-गायिकांना मंच देणारा इंडियन आयडॉल यंदा परीक्षकांच्या खास तिकडीसह परतला आहे. ज्यात श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांचा समावेश आहे.  या स्पर्धेत देशभरातून आलेले स्पर्धक आपल्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकत असल्याने हा हंगाम संगीत, आठवणी आणि भावना यांचा उत्सव बनला आहे.


इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांच्या मनातच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही भावत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांनीही या हंगामाच्या संकल्पनेचे कौतुक केले असून, त्यांच्या 'यादों की प्लेलिस्ट' मधील खास गाणी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहेत.


प्रियदर्शिनी इंदळकर म्हणाली,
“माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये 'राब्ता’ हे गाणं आहे . जे एखाद्या व्यक्तीची नाही, पण आयुष्यातील प्रेमाची आठवण नक्की करून देतं.”






तर नम्रता संभेराव ने सांगितले की,
“माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये ‘दिल दीवाना बिन सजना के’ हे गाणे आहे. जे मी नेहमी माझ्या नवऱ्यासाठी गाते. आणि खरं सांगायचं तर, ते त्याचे आवडते गाणे आहे.”



या दोन्ही प्रसिद्ध मराठी कलाकारांकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे इंडियन आयडॉल चा वारसा किती चिरंतन आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यादों की प्लेलिस्ट हा नवा हंगाम प्रेक्षकांच्या तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मनातही स्थान मिळवतो आहे.
Comments
Add Comment

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे