दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई


चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक


मुंबई (प्रतिनिधी) : यावर्षी दिवाळी हंगामात राज्य परिवहन (एसटी) ला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक आहे. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


यावर्षी १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी २० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे दिवाळी सुट्टीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला २९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून ते २० कोटी ४७ लाख रुपये आहे.


त्याखालोखाल धुळे विभागाने १५ कोटी ६० लाख रुपये आणि नाशिक विभागाने १५ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामापेक्षा यावर्षी महामंडळाने तब्बल ३७कोटी रुपये उत्पन्न जास्त मिळाले आहे.


यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती पामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटीपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला; परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १,०४९ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते.



तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन गरजेचे


तथापि, ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्यानगर, अमरावती, बुलडाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला; परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरीवावत वरिष्ठ पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने तोट्चात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


Comments
Add Comment

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०