लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे एका सभेत बोलताना विरोधकांना खोचक टोला मारला आहे. यावेळी ते म्हणाले, "बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव हे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ह्या त्यांच्या मुलाला देशाचा पंतप्रधान बनवू इच्छित आहेत. पण ही दोन्हीही पदे रिक्त नाहीत." त्यामुळे विरोधकांना सरळ शब्दात उत्तर मिळाले आहे.



बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याकरता अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. दरम्यान आज दरबंगा येथे प्रचारार्थ गेलेल्या अमित शाहांनी सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत एका दगडात चार पक्षी मारले आहेत.




तसेच लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा आणि नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा या प्रकरणात सहभागी आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसवर १२ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत, असे म्हणत अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यावर घणाघात केला आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या