सियोल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच भारतासोबत मोठा व्यापार करार (Trade Deal) करण्याची घोषणा बुधवारी केली. दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) सीईओ समिट मध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या आपल्या संबंधांचे कौतुक केले आणि त्यांच्याबद्दल आपल्याला 'अत्यंत आदर' असल्याचे स्पष्ट केले. APEC परिषदेत उपस्थित असलेल्या व्यावसायिक नेत्यांसमोर ट्रम्प म्हणाले, "मी लवकरच भारतासोबत एक व्यापार करार करत आहे आणि मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. आमचे संबंध खूप चांगले आहेत."
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) ड्रग्स सिंडिकेटला मोठा झटका बसला आहे. दाऊदचा जवळचा हस्तक आणि मुंबईतील डोंगरी भागात त्याची ड्रग्सची ...
पंतप्रधान मोदींविषयी बोलताना ट्रम्प यांनी मिश्किल टिप्पणीही केली. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी खूप चांगले दिसणारे व्यक्ती आहेत. ते असे दिसतात की त्यांना तुमचा बाप बनायला आवडेल," असे म्हणून ट्रम्प थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले, "ते (मोदी) किलर आहेत, त्यांची सामग्री... नाही, आम्ही लढू." ट्रम्प यांच्या या वक्तव्याने परिषदेत हशा पिकला.
दक्षिण कोरियातील ग्योंगजू शहरात आयोजित या कार्यक्रमात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील 'युद्ध' टाळल्याचा दावा केला. "दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांवर (भारत आणि पाकिस्तान) व्यापारावरून दबाव टाकून मी त्यांच्यातील युद्ध टाळले," असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. ट्रम्प बुधवारी दक्षिण कोरियात दाखल झाले आहेत. येथे सुरू असलेल्या APEC परिषदेत ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत