रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना कोर्टाचा दणका!

शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश!


नागपूर : नागपूर येथील परसोडी गावाजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली आहे.


आंदोलनाची परवानगी २८ ऑक्टोबरसाठी होती मात्र, २९ तारखेला देखील आंदोलन सुरू असल्यामुळे परिसरातील वाहनांना व प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. या भागात अनेक रुग्णालये असून, रुग्णांना देखील हालचाल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे खंडपीठाने निदर्शनास आणले.


नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी हा आदेश अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.


कोर्टाच्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्त, परिसराचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग पोलिस यांनी आदेशाची पूर्तता करण्यास सांगितले आहे. पोलीसांच्या स्पेशल ब्रॅंचचे डीसीपी सातव यांनीही बच्चू कडू यांना भेटून आदेशाबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment

बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून उड्डाणे!

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील