७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे सिद्ध केले आहे. सात महिन्यांची गर्भवती असताना, सोनिकाने अशी उल्लेखनीय कामगिरी केली की तिच्या दृढनिश्चयाचे सर्वत्र कौतुक झाले. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग क्लस्टर २०२५-२६ आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात आले होते. कॉन्स्टेबल सोनिका यादवने केवळ सहभाग घेतला नाही तर इतिहासही रचला. ती सात महिन्यांची गर्भवती असताना तिने १४५ किलोग्रॅम वजन उचलून वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकले. जेव्हा सोनिकाने चॅम्पियनशिप स्टेजवर पाऊल ठेवले तेव्हा कोणीही तिच्या कामगिरीचा अंदाज लावू शकत नव्हते. लोकांना वाटले की तिने अधिक वजन उचलण्यासाठी तिचा वर्ग बदलला आहे. जेव्हा तिने १४५ किलोग्रॅम वजन उचलले, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.


सुरुवातीला, सोनिया गर्भवती आहे हे कोणालाही कळले नाही, कारण तिने सैल कपडे घातले होते. बेंच प्रेसनंतर, जेव्हा पतीने तिला उठण्यास मदत केली, तेव्हा स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. सोनिकाला मे महिन्यात कळले की ती गर्भवती आहे. तिच्या पतीनेही विचार केला होता की, ती तिच्या गरोदरपणात जिममध्ये जाणे आणि प्रशिक्षण थांबवेल; परंतु सोनिकाने तसे केले नाही. ती थांबणार नाही असा तिचा दृढनिश्चय होता. ती म्हणते की या धाडसामुळे तिला चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकण्यास मदत झाली. याच स्पर्धेत सोनियाने १२५ किलो स्क्वॅट केले, ८० किलो बेंच प्रेस केले आणि १४५ किलो डेडलिफ्ट केले. ती म्हणते की तिने इंटरनेटवर शोध घेतला आणि लुसी मार्टिन्स नावाच्या महिलेने तिच्या गरोदरपणात असाच पराक्रम केल्याचे आढळले. त्यानंतर सोनियाने इंस्टाग्रामवर लुसीशी संपर्क साधला आणि तिला प्रशिक्षण टिप्स विचारल्या. यानंतर तिने तसेच केले.

Comments
Add Comment

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

Danish Chikna : दाऊदच्या ड्रग्स सिंडिकेटला NCB चा झटका! डोंगरीतील 'ड्रग्स फॅक्टरी' सांभाळणारा दाऊदचा खास माणूस दानिश चिकनाला गोव्यातून अटक

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) ड्रग्स सिंडिकेटला मोठा झटका बसला आहे. दाऊदचा जवळचा हस्तक आणि

Droupadi Murmu : ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 'राफेल'मध्ये स्वार; लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती!

हरियाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला हवाई दल स्थानकावर राफेल (Rafale) लढाऊ

कर्नाटकात आरएसएसला दिलासा! कॉंग्रेस सरकारच्या 'त्या' आदेशावर खंडपीठाची स्थगिती

कर्नाटक: सरकारी आवारात कोणतेही उपक्रम आयोजित करण्यापूर्वी खासगी संस्थांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक

CNAP Service : फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना आळा! 'CNAP' सेवेमुळे अनोळखी व्यक्तीचे टेन्शन गेले; सरकारचे मोठे पाऊल

नवी दिल्ली : मोबाईलवर येणारे अज्ञात (Unidentified) कॉल ही अनेक वापरकर्त्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. अनोळखी

‘मोंथा’चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’

नवी दिल्ली  : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून या चक्रीवादळाला थायलंडने