मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये देशभरातील बँका एकूण ९ ते १० दिवस बंद राहणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दर महिन्याला बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करते. या यादीत राष्ट्रीय, धार्मिक, प्रादेशिक सुट्ट्या तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असलेल्या नियमित सुट्ट्यांचा समावेश असतो. त्यामुळे बँकेत जाण्याआधी ही यादी तपासल्यास गैरसोय टाळता येईल.
नोव्हेंबर २०२५ मधील बँक सुट्ट्यांचा तपशील
१ नोव्हेंबर: कुट (मणिपूर), पुदुचेरी लिबरेशन डे (पुदुचेरी), हरियाणा डे (हरियाणा), कन्नड राज्योत्सव (कर्नाटक)
५ नोव्हेंबर: गुरु नानक जयंती (महाराष्ट्र), कार्तिक पौर्णिमा (ओडिशा, तेलंगणा)
७ नोव्हेंबर: वांगाला सण (मेघालय)
८ नोव्हेंबर: कनकदास जयंती (कर्नाटक)
११ नोव्हेंबर: ल्हबाब दुचेन (सिक्कीम)
२३ नोव्हेंबर: सेंग कुट स्नेम (मेघालय)
२५ नोव्हेंबर: सर्वत्र गुरु तेग बहादुर शहिद दिन
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील बँका फक्त ५ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती) रोजी बंद राहतील. ऑक्टोबरमध्ये अनेक सुट्ट्या झाल्यानंतर नोव्हेंबर तुलनेने शांत राहणार आहे. त्यामुळे मागील महिन्यात राहिलेली बँक कामे या महिन्यात उरकून घ्या.
बँकांना सुट्टी असली तरी UPI, NEFT, RTGS आणि IMPS सारख्या डिजिटल बँकिंग सेवा तसेच ATM व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. म्हणजेच, ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही.
जर तुम्ही कर्ज, खाते व्यवहार, डिमांड ड्राफ्ट किंवा इतर बँक संबंधित कामकाजाचे नियोजन करत असाल, तर नोव्हेंबरच्या सुट्ट्यांची यादी लक्षात घेऊनच योजना आखा. वेळेत नियोजन केल्यास बँक बंद असल्याने होणारा त्रास टाळता येईल.