कोरियन ब्रँडच्या सिगारेटची सर्वात मोठी तस्करी उघडकीस

नागपूर  : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे परदेशी सिगारेट तस्करीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकार उघडकीस आला. एअर अरेबियाच्या शारजाह-नागपूर विमानातून ६५० पॅकेट्समध्ये सुमारे दीड लाख सिगारेट आणल्या गेल्या. या मालाची किंमत १२ लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.


एअर अरेबियाची शारजाह-नागपूर फ्लाइट (जी९-४१५) रविवारी पहाटे ४:१५ वाजता नागपूर विमानतळावर उतरली. प्रवासी बाहेर पडण्यापूर्वी सीमाशुल्क तपासणीदरम्यान दोन प्रवाशांच्या सामानात संशयास्पद वस्तू आढळल्या. पकडले गेलेले प्रवासी मोहम्मद जाकी आणि अब्दुल कादिर जहीर यांच्याजवळ एकूण सात पिशव्या सापडल्या. त्यात ६५० पॅकेट्समध्ये सुमारे दीड लाख सिगारेट्स ठेवलेल्या होत्या. तपासाच्या दृष्टीने हा माल कुठे नेण्यात येणार होता हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. या सिगारेट्स 'ईएसएसई स्पेशल गोल्ड' ब्रँडच्या असल्याचे समजते. सध्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे असा प्रश्नही उपस्थित होत आहे की, एवढ्या संख्येत सिगारेट्स प्रवाशांनी बॅग आणि हँड बॅगमधून कशा आणल्या?


नागपूर विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या सिगारेट्स कोरियन ब्रँडच्या असल्याचे समजते. प्रत्येक सिगारेटमध्ये सुमारे ३.५ मिग्रॅ टार, ०.४ ते ०.४५ मिग्रॅ निकोटिन आणि ५३ ते ५५ टक्के तंबाखू असते. या सुपर स्लिम सिगारेट्सचे आकर्षक सुवर्ण पॅकेजिंग असते. सांगितले जाते की, या सिगारेट्सची ऑनलाइन विक्रीही केली जाते. मात्र, कितीही आकर्षक पॅकेजिंग असले तरी शरीरासाठी त्याचे दुष्परिणाम कमी होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारच्या सिगारेट्सचे सेवन करणारी व्यक्ती हळूहळू धूम्रपानाची सवय लावून घेते.


सूत्रांच्या मते, परदेशी सिगारेट तस्करीमागे जास्त नफा मिळवण्याचा हेतू असतो. 'ईएसएसई' व्यतिरिक्त 'गुडंग गरम', 'माँड', 'डनहील' आणि 'डेवीडॉफ' या ब्रँड्सचीही तस्करी केली जाते. भारतातील जास्त कर आणि सीमाशुल्क टाळण्यासाठी अशी तस्करी केली जाते. कुरिअर सेवा आणि वैयक्तिक सामानाद्वारेही या सिगारेट्स एअर रूटने देशात आणल्या जातात. तरुणांप्रमाणेच अनेक महिला ग्राहकांमध्येही या सुपर स्लिम सिगारेट्सची मागणी वाढत आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

साबरमती तुरुंगात कैद्यांचा आयसिसच्या दहशतवाद्यावर हल्ला; हल्ल्याचा हेतू अस्पष्ट

अहमदाबाद : गुजरातच्या साबरमती तुरुंगात तीन कैद्यांनी तेथील उच्च सुरक्षा कक्षात बंद असलेल्या आयसिस दहशतवादी डॉ.

भारतात येताच गुंड अनमोल बिश्नोईला एनआयएने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल याची अमेरिकेतून हकालपट्टी झाली. अमेरिकेतून भारतात येताच

महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या

अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी

पुण्यात घडतंय तरी काय? ऑनलाईन फसवणूक करत खात्यातील लाखोंची रक्कम लंपास

पिंपरी : सध्या डिजिटल व्यवहारामुळे घरबसल्या बँकेची कामं सोपी झाली आहेत. मात्र या ऑनलाईन व्यवहारामुळे अनेक