बलात्कार प्रकरणी ज्योतिषी खरातला अटक

नाशिक : राजकीय नेत्यांचा ज्योतिषी असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन (वय ६७) याला पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणात अटक केली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नोव्हेंबर २०२२ मध्ये पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला खरातला कॅनडा कॉर्नरवरील ओंकार प्रॉपर्टीज येथे भेटली होती. त्या ठिकाणी अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या ज्योतिषाची नाशिक, ठाणे, अहिल्यानगर आदी ठिकाणी कोट्यवधीची मालमत्ता आहे.


कोण आहे ज्योतिषी खरात ?


नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये