मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एकूण २३ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्र. ०१०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष, ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१०१३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -दानापूर अनारक्षित विशेष, ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१०७९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २२.३० वाजता सुटेल.
गाडी क्र. ०११४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल. क्र. ०१०४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-मुजफ्फरपुर विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०४२२५ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.५५ वाजता सुटेल.
गाडी क्र. ०१४३१ पुणे-गाझीपूर सिटी विशेष ही गाडी पुणे येथून सकाळी ०६.४० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष ही गाडी पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४४९ पुणे-दानापूर विशेष ही गाडी पुणे येथून १५.३० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४८३ पुणे-हजरत निजामुद्दीन विशेष ही गाडी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४०३ पुणे-अमरावती विशेष ही गाडी पुणे येथून रात्री १९.५५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४०१ पुणे-नागपूर विशेष ही गाडी पुणे येथून रात्री २०.३० वाजता सुटेल.
गाडी क्र. ०१२०२ हडपसर नागपूर विशेष ही गाडी हडपसर येथून दुपारी १५.५० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४३० हडपसर-लातूर विशेष ही गाडी हडपसर येथून १६.०५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०७६०८ हडपसर-नांदेड विशेष हडपसर ही गाडी येथून २२.५० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४२१ दौंड-कलबुरगी अनारक्षित विशेष ही गाडी दौंड येथून पहाटे ०५.०० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४५१ कोल्हापूर-कलबुरगी विशेष ही गाडी कोल्हापूर येथून सकाळी ०६.१० वाजता सुटेल.
गाडी क्र. ०६२०८ कलबुरगि गाडी-बंगळूरु छावणी विशेष ही गाडी कलबुरगी येथून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४२२ कलबुरगी-दौंड अनारक्षित विशेष ही गाडी कलबुरगी येथून दुपारी १६.१० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४५२ कलबुरगी-कोल्हापूर विशेष ही गाडी कलबुर्गी येथून १८.१० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४२९ लातूर-हडपसर विशेष ही गाडी लातूर येथून ०९.३० वाजता सुटेल.
गाडी क्र. ०१४१० नागपूर-पुणे विशेष ही गाडी नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१०१२ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ही गाडी नागपूर येथून २२.१० वाजता सुटेल.