Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ICU मध्ये दाखल; डॉक्टरांनी सांगितले अंतर्गत रक्तस्रावाचे कारण!

सिडनी : भारतीय वनडे क्रिकेट संघाचा (Indian ODI Team) उपकर्णधार (Vice-Captain) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याला सिडनी येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्राव (Internal Bleeding) झाल्याचे निदान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसला पुढील पाच ते सात दिवस रुग्णालयातच राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, क्रिकेट चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे लक्ष आता श्रेयस अय्यरच्या तब्येतीच्या अपडेट्सकडे लागले आहे.



कशी झाली दुखापत?


श्रेयस अय्यर याला अंतर्गत रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुखापत त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सिडनी येथे झाली होती. ऑस्ट्रेलियन फलंदाजीच्या ३४ व्या ओव्हरमध्ये श्रेयसला ही दुखापत झाली. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर फलंदाज एलेक्स कॅरीचा झेल पकडत असताना ही घटना घडली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरने मागे धावत जाऊन हा झेल पकडला. मात्र, याच प्रयत्नात त्याच्या बरगड्यांना गंभीर मार लागला. या दुखापतीमुळेच त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले असून, त्याला अंतर्गत रक्तस्रावाचा त्रास होत आहे.



मैदानावरच वेदनेने विव्हळला श्रेयस अय्यर


सिडनी वनडेत झेल पकडताना झालेल्या दुखापतीमुळे उपकर्णधार श्रेयस अय्यरची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. मैदानावरच तो पोट आणि छातीचा भाग पकडून वेदनेने विव्हळताना स्पष्टपणे दिसला. यावरून त्याच्या दुखापतीची गंभीरता दिसून आली. त्याची अवस्था पाहून तात्काळ मेडिकल टीमला मैदानावर बोलवण्यात आले आणि टीमने त्याला मैदानाबाहेर नेले. या गंभीर इंजरीची गंभीरता लक्षात घेऊनच त्याला तातडीने सिडनी येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.



उपचारासाठी श्रेयस अय्यरला आठवडाभर रुग्णालयात ठेवणार


टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेचा भाग नसला तरी, त्याला तातडीच्या उपचारासाठी सिडनीमध्येच थांबवण्यात आले आहे. त्याला झालेली अंतर्गत रक्तस्रावाची दुखापत गंभीर असल्याने, टीम मॅनेजमेंटने त्याला उपचारासाठी सिडनीतील रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, श्रेयस अय्यरला सुमारे आठवडाभर रुग्णालयातच राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मॅनेजमेंट त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.



श्रेयस अय्यरचे मैदानावर पुनरागमन कधी?


श्रेयस अय्यर रुग्णालयात उपचाराधीन असल्याने, तो पुन्हा मैदानावर कधी परतणार, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींकडून विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र, ही केवळ शक्यता असून, श्रेयस अय्यरच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याच्या दुखापतीची गंभीरता पाहता, बीसीसीआय (BCCI) आणि वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीचा आढावा घेऊन लवकरच याबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात