Game Changers Fab IPO: उद्यापासून गेमचेंजर्स टेक्सफॅब आयपीओ बाजारात दाखल

मोहित सोमण:उद्या २८ ऑक्टोबरपासून गेम चेंजर टेक्सफॅब लिमिटेडचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. ५४.८४ कोटी बूक व्हॅल्यु असलेला हा आयपीओ उद्या २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने ९६ ते १०२ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला आहे. माहितीनुसार, ४ नोव्हेंबरला कंपनीचा शेअर बीएसई एसएमईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. Corpwis Advisors Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Skyline Financial Services Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून NNM Securities Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी मार्केट मेकर म्हणून काम करेल. माहितीनुसार, १० रूपये प्रति शेअर दर्शनी मूल्य (Face Value) असलेला शेअर गुंतवणूकदा रांसाठी खुला असेल. एकूण ५३७६००० कोटी शेअरचा हा फ्रेश इशू असून त्यापैकी २७०००० शेअर मार्केट मेकरसाठी राखीव असतील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच सर्वसामान्य गुंतवणूक दारांना एकूण यापैकी ५१०६००० शेअर गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील.


एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ५०% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB), किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५% वाटा, तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) १५% वाटा उपलब्ध असेल. अंकुर अग्रवाल, संजीव गोयल फोर्स मल्टिप्लायर ईकॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. प्रवर्तकांचे भागभांडवल आयपीओपूर्वी ९८.६७% आहे जे आयपीओनंतर घसरेल. आर्थिक वर्ष २०२३-२५ मध्ये कंपनीच्या महसूलात (Revenue) इयर ऑन इयर बेसिसवर १८% वाढ झाली आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) १८३% वाढ झाली होती. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १८२.५१ कोटी रुपये आहे.


कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), खेळत्या भांडवल गरजेसाठी (Working Capital Requirements), दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) करण्यात येणार आहे. २०१५ मध्ये स्थापन झालेले, ट्रेडयुनो फॅब्रिक्स ही टेक्साटाईल उद्योगात कार्यरत आहे. विशेषतः कंपनी बी२बी मार्केटप्लेसमध्ये गुंतलेली आहे आणि फॅब्रिक उद्योगात विशेषज्ञता असलेली पुरवठा साखळी (Supply Chain) ऑर्केस्ट्रेशन कंपनी गेम चेंजर्स टेक्सफॅब प्रायव्हेट लिमिटेड द्वारे समर्थित आहे. कंपनी ग्राहकांच्या वैशिष्ट्यांवर आधारित उच्च-गुणवत्तेचे कापड सोर्स करण्यात, पुरवठादारांची निवड करण्यात, किंमतींवर वाटाघाटी करण्यात आणि कापड उत्पादनासाठी कापडाची गुणवत्ता आणि शाश्वतता (Sustainability) सुनिश्चित करते.


कंपनी महिलांच्या पोशाख आणि तांत्रिक कापडांमध्ये विशेषज्ञ आहे विविध प्रकारचे कापड कंपनी ऑफर करते, ज्यामध्ये चांदण्या, फर्निचर अपहोल्स्ट्री, ताडपत्री, क्रीडा वस्तू आणि तंबू यासारख्या अनुप्रयोगांसाठी बाह्य आणि पीव्हीसी-लेपित कापडांचा समावेश आहे.कंपनी १० हून अधिक सोर्सिंग कार्यालये व्यवस्थापित करते, स्पर्धात्मक किमतीत दैनंदिन आणि प्रीमियम कापड प्रदान करते. ती कापड आणि कपड्यांसाठी नमुना केंद्र म्हणून काम करणारी दोन रिटेल स्टोअर देखील चालवते.कंपनी कापड प्रकार, प्रिंट, नमुना, प्रसंग, रंग आणि विशेष संग्रहानुसार वर्गीकृत केलेल्या १०००० हून अधिक डिझाइन ऑफर करते.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे? राजकीय वर्तुळाच्या नजरा मुख्यमंत्र्यांकडे

२३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत नुकतेच आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ सादर! वाचा 'हे' ४० महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर!

मोहित सोमण: नुकत्याच महत्वाच्या घडामोडीत समोर येत असलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघाताचे रहस्य उलगडणार! 'ब्लॅक बॉक्स' सापडला; तपासाला वेग

बारामती : बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने संपूर्ण देश हळहळला.

Ajit Pawar Last Rites : पार्थ आणि जय पवारांनी दिली मुखाग्नी; शासकीय इतमामात अजित दादा अनंतात विलीन

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला.

Stock Market Explainer: एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी 'खल्लास' तरीही दुपारपर्यंत बाजार का सावरत आहे?

मोहित सोमण: सुरूवातीच्या एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींचे नुकसान झाले असले तरी पुन्हा एकदा शेअर बाजाराने

Ajit Pawar Passed Away : अजित पवार अमर रहे! साश्रू नयनांनी 'दादां'ना अखेरचा निरोप; बारामतीमध्ये उसळला जनसागर

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक