माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाजपच्या वाटेवर! कोकणात उबाठासाठी निर्माण झाली मोठी घळ

रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असून शिवसेना उबाठा गटाचे खेळाडू मॅचपूर्वीच मैदान सोडत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उबाठासाठी बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता महायुतीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. ज्यात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.



२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीतील अनेकजणांनी महायुतीची वाट धरली. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान उबाठा गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवार, २८ ऑक्‍टोबर रोजी प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत.




नागेंद्र राठोड यांनी काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. उबाठा गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राठोड कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता राठोड यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीमध्ये उबाठा गटासाठी रायगडमध्ये मोठा खड्डा पडणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये

बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज उखडून टाकू!

पंतप्रधान मोदींचे विजयसभेत ‘बंगाल’साठी एल्गार नवी दिल्ली  : काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन

अरुण गवळींची दुसरी कन्याही राजकारणात

भायखळ्यातून महापालिका निवडणूक लढवणार सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन

बिहार निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत मुंबई  : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.