सोलापूर: सध्या राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे दिसून येते.
राज्यात निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु असते. मात्र एकाच वेळी चार जणांनी पक्षांची साथ सोडल्याने महाविकास आघाडीला मध्ये मोठे खिंडार पडले आहे. यामुळे भाजपचे ऑपरेशन लोटस सोलापूरमध्ये यशस्वी होताना दिसत आहे. हा पक्षप्रवेश बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी क्रमांक १८६४ (MH-01 AP 0748) अखेर इतिहासजमा ...
माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३० हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता. या पराभवानंतर रणजित शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजित शिंदे यांचा हा निर्णय माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरणार आहे.
रणजित शिंदे यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भाजपच्या हालचालींना बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.