शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना अखेर विवाह बंधनात अडकले आहेत


आज २६ फेब्रुवारी २०२६ ला राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघांनी आयटीसी मेमेंटोज येथे लग्नगाठ बांधली. विवाह सोहळा हा दोघांच्या रितीरिवाजने संपन्न झाला आहे. सकाळी पारंपरिक तेलगू पद्धतीने तर संध्याकाळी रश्मिकाचा कोडवा पद्धतीने करण्यात आला. लग्न अगदीच जवळच्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्तिथीत पार पडले. अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने, शांततेत विवाह सोहळा संपन्न झाला.





विजय आणि रश्मिकाने लग्नसोहळ्यात पारंपरिक दाक्षिणात्य पेहराव केल्याचे पाहायला मिळत आहे, लाल रंगाची साडी, गळ्यात सोन्याच्या माळा - हार -बाजूबंद-, हातात पारंपरिक बांगड्या, कमरपट्टा, नववधू असावी तर अशीच तर विजयने सुद्धा धोतर , लाल रंगाचा शेला असा शाही पेहराव केला होता .


विवाहसोहळ्याचे फोटो इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अखेर चाहत्यांची ईच्छा पूर्ण झाली असून सर्वजण वधूवरांना कमेंट्स मधून शुभाशीर्वाद देत आहेत.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट