सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, आवाजी मतदानाने निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत वरळीच्या डोममधील हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे देशातील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, पार्थ पवार हे पण बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष या पदासाठी सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सादर झाला. या प्रस्तावावर आवाजी मतदान झाले आणि सर्वानुमते सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. या निवडीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनेत्रापर्व सुरू झाले.





बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदान झाले आणि सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली.


अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. ज्यांचं आमच्या पक्षाशी काहीही देणंघेणं नाही, ते आम्हाला उपदेश करत आहेत. महिन्याभरात तुम्ही पाहिलंच असेल. काही जण इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत पटेलांनी रोहित पवारांचा नाव न घेता समाचार घेतला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबद्दलची चर्चा सुरु झाली. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Perfect Tea Tips : चहा बनवताना दूध आधी टाकावं की नंतर ? घरी टपरीसारखा कडक चहा बनवा अन् 'या' सोप्या ट्रिक्स वापरून वाढवा चहाची चव!

मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की रिमझिम पावसात हातात गरमागरम चहाचा कप धरून बसण्याची मजा काही वेगळीच असते.

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "