मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्याचे प्रतीक मानला जातो. कार्तिक महिन्यात हा सोहळा साजरा केला जातो. तुळशीला भगवान विष्णूची प्रत्यक्ष रूप मानले जाते, त्यामुळे तिचा विवाह साजरा करणे हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. घरातील स्त्रिया कुटुंबाच्या सुख समृध्दीसाठी प्रार्थना करतात.
तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते, त्यामुळे तिचा विवाह म्हणजे भक्ती, निष्ठा आणि धार्मिक समर्पणाचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. ही परंपरा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे कारण या सोहळ्याद्वारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात, सामाजिक बांधिलकी दृढ होते आणि मुलांना परंपरेची जाण होते.
तुळशी विवाहाची तारीख आणि शुभ मुहूर्त २०२५
द्वादशी तिथीची सुरूवात: २ नोव्हेंबर २०२५, सकाळी ७:३१ वाजता
द्वादशी तिथीची समाप्ती: ३ नोव्हेंबर २०२५, सकाळी ५:०७ वाजता
महत्त्वाचे मुहूर्त:
सूर्योदय: ६:३४ वाजता
सूर्यास्त: ५:३५ वाजता
चंद्र उदय: ३:२१ दुपारी
ब्रह्म मुहूर्त: ४:५० – ५:४२ सकाळ
विजय मुहूर्त: १:५५ – २:३९ दुपारी
गोधूळ मुहूर्त: ५:३५ – ६:०१ संध्याकाळ
निशिता मुहूर्त: ११:३९ – १२:३१ रात्री
पूजा विधी
तुळस स्वच्छ करून घेणे, कुंडी किंवा वृंदावन सजवावे. शुभ मुहूर्तावर तुळशीला फुले, फळे, हार, हळद-कुंकू अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावावी. तुळशीच्या समोर श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा करावी. यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणाव्या आणि विवाह विधी पूर्ण करावा.आपल्या सोयीनुसार ब्राह्मणांना बोलावून विधी पार पाडावे किंवा स्वतःच घरातील मोठ्या मंडळींच्या मार्गदर्शनाने पूजा करावी.