Starlink इंटरनेट सेवा भारतात लवकरच सुरु होणार

मुंबई : एलन मस्क यांची स्टारलिंक कंपनी ही लवकरच भारतात सुरु होणार आहे. यासाठी कंपनीने नऊ भारतीय शहरांमध्ये सॅटेलाईट बेस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. फाल्कन ९ हे रॉकेट वापरून २८ उपग्रह अवकाशात पाठवण्यात असून याद्वारे इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. या कंपनीची सेवा भारतात केव्हा सुरु होणार याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. स्टारलिंक सेवा भारतात केव्हा सुरु होणार आतापर्यंतच्या माहितीनुसार एलोन मास्क यांच्या कंपनीने १० हजार स्टारलिंक उपग्रह अवकाशात सोडले आहेत. यामुळे जगातील कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा देणे शक्य असणार आहे.


या कंपनीने १० देशांमध्ये आपली इंटरनेट सेवा सुरु केली आहे. स्टारलिंक या कंपनीला भारतात सुद्धा आपली सेवा सुरु करण्यासासाठी नियामक परवानगी मिळाली आहे. इंटरनेट सेवा भारतात केव्हा सुरु होणार ट्रायने स्पेक्ट्रम वाटप प्रक्रिया पूर्ण केल्यांनतर स्टारलिंक ची उपग्रह इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ही इंटरनेट सेवा सुरु करण्याची अपेक्षा आहे. या इंटरनेट सेवेसाठी मस्क यांची कंपनी ९ शहरांमध्ये गेटवे अर्थ स्टेशन म्हणजे उपग्रह बेस स्टेशन उभारणार आहे. हे बेस दिल्ली जवळील नोएडा, लखनऊ, हैदराबाद, कोलकता, चंदीगड आणि मुंबई यांसारख्या शहरात उभारले जाणार आहेत.


नेटवर्क नसले तरी ही कॉल करता येणार स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरु झाल्यांनतर युजर्स मोबाइलला नेटवर्क नसेल तरीही कॉलिंग आणि इंटरनेट वापरू शकणार आहेत. स्टारलिंकने गेल्या वर्षी 'डायरेक्ट टू सेल' तंत्रज्ञानाची चाचणी केली होती, यात नेटवर्कशिवाय कॉल करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे. अडचणीच्या काळात ही सेवा लाभदायक ठरणार आहे. एलन मस्क यांच्या स्टारलिंकची 'डायरेक्ट टु सेल' युजर्स मोबाईल द्वारे वापरू शकणार आहेत. यासाठी कोणताही विशेष हार्डवेअर आवश्यक नाही.


याआधी स्टेरलिंकने बेस स्टेशन चालवण्यासाठी परदेशी तज्ञांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र भारत सरकारने स्टारलिंकला सांगितले की गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळेपर्यंत भारतीय नागरिकच स्टेशनची देखरेख करतील

Comments
Add Comment

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून

महसूली सुनावण्याचे अधिकारी राज्यमंत्री, सचिवांनाही!

विभागातील १३ हजार अपीलांच्या निपटाऱ्यासाठी मार्ग मोकळा मामलतदार न्यायालय अधिनियमन सुधारणा विधेयक विधानसभेत

मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना हक्काचे घर

'मदत माश' जमिनीच्या मोफत नियमितीकरणाचा मार्ग मोकळा ​'वर्ग-२' च्या जमिनी आता होणार 'वर्ग-१' महसूल मंत्री चंद्रशेखर

महसूल विभागातील सर्व खटले ९० दिवसांत निकाली काढणार

महसूलमंत्र्यांचे आश्वासन; सुनावण्यांचे अधिकार आता राज्यमंत्री आणि सचिवांनाही नागपूर : महसूल विभागातील

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण