मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी अवघ्या ३५ वर्षाची असून जुजुत्सू खेळात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहिणीची लहान बहीण रोशनीच्या घरात लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिने प्राण सोडला होता. रोहिणीच्या या चुकीच्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात आता खळबळ उडाली आहे.
रोहिणीची लहान बहीण रोशनीने सांगितलं की, रोहिणी सध्या एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच या पदावर कार्यरत होती. तिचे शाळेत काही वाद सुरु होते. ती शनिवारी घरी आली, त्यावेळी नाराज असल्याची दिसली. तसेच रोहिणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिचे फोनवर कोणासोबत तरी बोलणे झाले होते. यानंतर ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. हा फोन कोणाचा याबद्दल अजून माहिती मिळाली नाही. दरम्यान तिची आई आणि बहीण सकाळी देवदर्शनाला गेले होते. तर वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नसताना रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच परिचित असलेल्या तरुणाने दोन ...
रोहिणीने आत्महत्या का करत आहे? याबद्दल कोणाशीच काहीच संवाद साधला नाही. अथवा कोणती चिठ्ठीदेखील लिहीली नाही. त्यामुळे आता केवळ त्या एका फोन नंबरवरून पोलिसांना तपास करावा लागणार आहे. या प्रकरणाबाबत मध्यप्रदेशच्या बँक नोट प्रेस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.
रोहिणीने हाँगझोऊमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते. या व्यतिरिक्त तिने भारतासाठी अनेक पदके जिंकली होती. थायलँडमध्ये झालेल्या ओपन ग्रँड प्रिक्समध्ये तिने चांगली कामगिरी केली होती. तर बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत ४८ किलोग्रॅम वजनाच्या गटात कांस्यपदक पटकावले होते.